बँकांकडून वसुलीच्या तगाद्यामुळे कर्जदार त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:54 PM2018-03-24T23:54:17+5:302018-03-24T23:54:17+5:30

मार्च एंडिंगचे तुणतुणे वाजवत बँका वसुलीचा तगादा लावत आहेत. यावर्षी आर्थिक व्यवहार विस्कटल्याने कर्जदार शेतकरी, व्यावसायिक त्रस्त आहेत.

The borrowers suffer due to the recovery of bank deposits | बँकांकडून वसुलीच्या तगाद्यामुळे कर्जदार त्रस्त

बँकांकडून वसुलीच्या तगाद्यामुळे कर्जदार त्रस्त

Next
ठळक मुद्देमार्च एंडिंग : अधिकाऱ्यांना आवरा : शेतकऱ्यांसह व्यावसायिक हवालदिल

आॅनलाईन लोकमत
वरूड : मार्च एंडिंगचे तुणतुणे वाजवत बँका वसुलीचा तगादा लावत आहेत. यावर्षी आर्थिक व्यवहार विस्कटल्याने कर्जदार शेतकरी, व्यावसायिक त्रस्त आहेत. तरीही पोलीस आणि जप्तीच्या धमक्या देऊन बँक अधिकाऱ्यांनी वसुलीचा सपाटाच लावला आहे. प्रशासनाने यावर शिथिलता आणावी, अशी मागणी कर्जदार करीत आहेत.
वरूड तालुक्यात कर्ज वसुलीसाठी गहाण मालमत्ता, घरातील साहित्य जप्तीच्या धमक्या देऊन कर्जवसुलीचे प्रयत्न बँक अधिकाऱ्यांनी चालविले आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याची चर्चा आहे. एकीकडे शेतातील उत्पादनाने दगा दिला. निघालेल्या शेतमालाला भाव नाही. निसर्गाची साथ नाही. दुसरीकडे कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न आहे. याकरिता एकही लोकप्रतिनिधी वा अधिकारी बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे या अधिकाºयांना आवर घालणार तरी कोण, हा प्रश्न कर्जदारांना सतावत आहे.
अवसायनातील संस्थांच्या ठेवीची जबाबदारी कुणाची?
अनेक पतसंस्था, सहकारी बँका, बाहेरच्या सहकारी पतपुरवठा संस्थांमध्ये नागरिकांनी विश्वासाने लाखो रुपयांच्या ठेवी जमा केल्या. कुणी पै-पै जमा केलेली राशी बँकांमध्ये संचयित केली. मात्र, यातील काही बँका, पतसंस्था अवसायनात निघाल्याने कोट्यवधी रुपयांचे अपहार झाले, याची जबाबदारी सरकार का घेत नाही? सदर पतपुरवठा संस्थांना परवानगी शासनाने दिलेली आहे, तर खातेदारांच्या ठेवीची जबाबदारी का घेत नाही, असा सवालसुद्धा नागरिकांतून केला जात आहे.
शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या निकषात ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही, अशा शेतकऱ्यांपुढे कर्जाचा भरणा करण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बँक अधिकारी त्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Web Title: The borrowers suffer due to the recovery of bank deposits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.