कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 02:54 PM2018-06-11T14:54:13+5:302018-06-11T14:54:13+5:30

भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला.

The birth of rare rare snakes given through artificial process, the first experiment in India | कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

कृत्रिम प्रक्रियेतून दिला दुर्मिळ बिनविषारी सापांना जन्म, भारतातील पहिलाच प्रयोग

Next

- इंदल चव्हाण

अमरावती : भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. दोन दिवसांनंतर वनाधिका-यांच्या समक्ष त्यांना जंगलात सोडण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याची प्रतिक्रिया उपवनसंरक्षकांनी दिली.
दोन महिन्यांपूर्वी पिवळ्या ठिपक्याचा कवड्या अतिशय दुर्मिळ असलेला बिनविषारी साप अमरावतीतील नवसारी भागात आढळला. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो थोडाफार जखमी झाला. साप पडण्यासंदर्भात हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष रत्नदीप वानखडे यांना कळविण्यात आले. सदस्य श्रीकांत गावंडे, शुभम गायकवाड, विक्की गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन साप पकडला. त्या मादी सापाला घरी नेले. त्याच रात्री १६ एप्रिल २०१८ रोजी तिने चार अंडी दिली. त्यानंतर सात तेथून निघून गेला. त्यातील दोन अंडी अनमॅच्युअर निघाल्याने खराब झाल्या. उर्वरित दोन अंडींना सर्पतज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ह्युमिडिटी बॉक्समध्ये ठेवण्यात आले. शिवाय अंड्यांना बुरशी लागू नये म्हणून हेल्प फाऊंडेशनचे सदस्य अक्षय होले, राम करूले, सुमेध गवई, पवन गायकवाड, उमंग सवाई, संदीप सोळंके आदींनी त्याच्या प्रजननाबद्दलची अचूक माहिती गोळा करून विशेष काळजी घेतली. साधारणत: २१ ते २४ डिग्री सेल्सिअस तापमान कायम राहण्यासाठी त्यांनी माती ओली करून ठेवली. ७ जून रोजी अंडी फुटून सापाचा जन्म झाला. त्यांना वनाधिकाºयांच्या मार्गदर्शनात जंगलात सोडण्यात आले. त्याप्रीत्यर्थ आरएफओंनी त्यांचा प्रोत्साहन दिले.

५१ दिवसांचा कालावधी
पिवळ्या ठिपक्याचा कवड्या साप भारतात तसा दुर्मिळच. अंडी दिल्यानंतर तेथून साप निघून जाते. पुन्हा त्या अंडींकडे फिरकत नाही. मात्र, ती अंडी विशिष्ट तापमानात रहावी, याचे भान ठेवूनच ती अंडी घालतात. ती अंडी ५१ दिवसांपर्यंत उबवली जाते. त्यानंतर त्यातून पिलं बाहेर पडते. त्यानंतर तो पिलू स्वत:चे भक्ष्य स्वत:च टिपतो. त्यामुळे त्याला मातेच्या सहकार्याची गरज भासत नाही.
 
जानेवारी ते मार्च प्रजनन काळ
हा सात महाराष्ट्रातील काही भागातच आस्रढळत असून, त्यांचा प्रजनन काळ जानेवारी ते मार्च दरम्यान राहतो. मार्चमध्ये अंडी घालून ते ४८ दिवसांपर्यंत उबवण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर ५१ दिवसांनी म्हणजेच जूनच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात पिल बाहेर येतात.
हा साप नवसारी भागातून ताब्यात घेतला. त्याने दिलेली अंडी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विशिष्ट तापमानात ठेवली व काळजी घेतली. पिलू बाहेर येताच उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांना कळविले. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंसा केली. हे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे ते म्हणाले.
- रत्नदीप वानखडे, 
अध्यक्ष, हेल्प फाऊंडेशन, अमरावती

Web Title: The birth of rare rare snakes given through artificial process, the first experiment in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.