शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 07:54 PM2017-12-24T19:54:41+5:302017-12-24T19:54:59+5:30

Bhausaheb's concept of creation of Krishi Vidyapeeth for the upliftment of farmers - Pandurang Phundkar | शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

शेतक-यांच्या उन्नतीसाठी कृषी विद्यापीठाची निर्मिती ही भाऊसाहेबांचीच संकल्पना - पांडुरंग फुंडकर 

Next

 अमरावती -  देशातील शेतक-यांची उन्नती व्हावी. तो जगाच्या बरोबरीने चालला पाहिजे,  त्याला सन्मानाने जगता आले पाहिजे. यासाठी  डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख हे केंद्रीय कृषि मंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यात कृषी विद्यापीठ स्थापन करण्याची संकल्पना मांडली. आज राज्यात चार कृषी विद्यापीठे असून अनेक  कृषी महाविद्यालये आहेत. त्याकाळात भाऊसाहेबांनी शेतकºयांसाठी केलेले कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. 
ते दर्यापूर येथील आदर्श हायस्कूल तथा कनिष्ट महाविद्यालयात शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त नवीन इमारतीचे उद्घाटन व शिक्षण महर्षी भाऊसाहेब देशमुख यांच्या ११९ व्या जयंत्युत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, नगराध्यक्षा  नलिनी भारसाकळे, संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेळके, नरेशचंद्र ठाकरे,  कोषाध्यक्ष दिलीपबाबु  इंगोले, कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, अशोकराव ठुसे, प्राचार्य रामेश्वर भिसे, बापूसाहेब कोरपे, मधुकर तराळ, पी.डी. बाबनेकर, दीपक हिरूळकर आदी उपस्थित होते.
भाऊसाहेबांनी त्या काळात कृषी विद्यापीठाची संकल्पना मांडून शेतकºयांना नवीन तंत्रज्ञान उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नवीन बियाणे उत्पादित केली पाहिजे. नवीन बियांणाचे संशोधन व्हावे. कमी खर्चात शेतकºयांना अधिक उत्पादन देणारे बियाणे निर्माण करता यावी. तसेच कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तयार झालेल्या शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे या विचारांतून ही संकल्पना मांडली व साकारलीसुद्धा. त्यामुळेच त्या आज शेतकºयांना बळ मिळाल्याचे ना. फुंडकर म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही भाऊसाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी खा. आनंदराव अडसूळ, आ. रमेश बुंदिले यांनी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेबांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी आसाममधील लोकनृत्य व योगाचे प्रात्यक्षिके लेझीम नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रास्ताविक प्रचार्य विजय खोरगडे  यांनी, तर संचालन डी.बी. ठाकरे, व ज्योती टेवरे यांनी केले. आभार उत्सवप्रमुख सुरेश घोगरे यांनी मानले. यावेळी सर्व आजीवन सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  

 शेतक-यांना आठ हजार नवीन ट्रॅक्टर देणार 
   शेतकरी शेती अवजारे व ट्रॅक्टर घेतील, त्यावरील सबसिडी त्वरित देऊन  मंजुर असलेला अर्ज दारांनी कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर व राटाव्हेटर व पेरणीयंत्र  खरेदी करावे. त्यांना त्यामध्ये सबसीडी देऊन ट्रक्टर देण्यात येईल. आतापर्यंत राज्यात चार हजार शेतक-यांना शासनाने ट्रॅक्टरचे वाटप केले असून मार्चपर्यंत आठ हजार नवीन ट्रॅक्टर शासन शेतक-यांना देणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. भाऊसाहेबांच्या जन्मगावी पापळ येथे कृषी महाविद्यालय देण्यात येणार असल्याचेही यावेळी घोषणा केली.

Web Title: Bhausaheb's concept of creation of Krishi Vidyapeeth for the upliftment of farmers - Pandurang Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.