भारिप-बहुजन महासंघाचा कलेक्ट्रेटवर घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:45 PM2019-06-17T23:45:46+5:302019-06-17T23:47:41+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत आढळली आहे. त्यामुळे सर्व ४८ मतदारसंघांतील निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे नव्याने मतदान घेण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघ व वंचित आघाडीकडून सोमवारी आयोगाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.

Bharip-Bahujan Mahasangh's collective collaboration | भारिप-बहुजन महासंघाचा कलेक्ट्रेटवर घंटानाद

भारिप-बहुजन महासंघाचा कलेक्ट्रेटवर घंटानाद

googlenewsNext
ठळक मुद्देआयोगाला निवेदन : ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदान व मतमोजणीच्या आकडेवारीत तफावत आढळली आहे. त्यामुळे सर्व ४८ मतदारसंघांतील निवडणूक रद्द करून बॅलेटद्वारे नव्याने मतदान घेण्याची मागणी भारिप-बहुजन महासंघ व वंचित आघाडीकडून सोमवारी आयोगाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला.
निवडणूक आयोगाने यासंदर्भात आयोगाने १५ दिवसांत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. याच मागणीसाठी राज्यात ‘ईव्हीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ’ या आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे. याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नंदेश अंबाडकर, चरणदास निकोसे, बाबाराव गायकवाड, रमेश आठवले, बाळासाहेब वाकोडे, विजय डोंगरे, अयाझभाई, सुखदेवराव पाटील, महादेवराव रंगारी, विजय भोंगळे, रामदास नवले आदी उपस्थित होते.

तिवसा तहसील कार्यालयात घोषणाबाजी
तिवसा : शहरातदेखील तहसील कार्यालयापुढे भारिप-बमसं, वंचित बहुजन आघाडीने घंटानाद आंदोलन केले. लोकशाही संरक्षणासाठी ‘ईव्हीएम हटाओ - देश बचाओ’ असा नारा देण्यात आला. आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने घेण्याची मागणी तहसीलदार रवि महाले यांना निवेदनातून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीतील मतदानात मोठी तफावत असून, ईव्हीएम मॅनेज करून भाजपक्ष निवडणुका जिंकत आहे, असे निवेदनात नमूद आहे. तालुकाध्यक्ष सागर भवते, दादाराव गडलिंग, गजानन रामटेके, पंकज कांबळे, प्रवीण निकाळजे, संदीप मकेश्वर, भुजंगराव वावरे, मनोज लांडगे, सागर लांडगे, राहुल गोपाळे, रोशन खडसे, विवेक मोरे, निखिल वानखडे, महिला आघाडी अध्यक्ष उज्ज्वला भुरभुरे, रूपाली मुंद्रे, किशोर तायडे आदी उपस्थित होते.

Web Title: Bharip-Bahujan Mahasangh's collective collaboration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.