लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 07:51 PM2018-06-27T19:51:09+5:302018-06-27T19:51:29+5:30

दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी  ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र...

Amrawati Crime News | लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार  

लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार  

Next

अमरावती -  दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी  ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र, याची कुणकुण लागताच हा एपीआय तक्राकर्त्यालाच आपल्या वाहनात बसवून फरार झाला. या दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. 

राहुलकुमार राऊत (३२) असे आरोपीचे सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव  आहे. सविस्तर माहितीनुसार, वर्धा येथील मोहिनीनगर येथील ३९ वर्षीय तक्रारदाराने मारेगाव ठाण्यातील एपीआयविरोधात एसीबीकडे तक्रार केली होती. त्याला एपीआय राऊतने ३० हजारांची मागणी केली होती. यासंदर्भाची पडताळणी  एसीबी अधिका-यांनी मंगळवारी केली आणि बुधवारी  सापळा रचला. मात्र, लाचेच्या मागणीच्या पडताळणीदरम्यान पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने यामधील तक्रारदाराजवळील व्हॉइस रेकॉर्डर एपीआयने हिसकले व तक्रारदाराला जबरदस्तीने स्वत:च्या खासगी वाहनात बसवून अज्ञात स्थळी घेऊन गेला. शासकीय कार्यात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एसीबीने राऊतविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ तसेच भादंविचे कलम ३९२, ३६५, १८६, २०१ अन्वये मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, दोघांचाही शोध सुरू असल्याचे एसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. 

एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, पोलीस शिपाई शेषराव सोयाम, निलेश पाखले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, भारत चिरडे, महेश वाकोडे, विशाल धलवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Amrawati Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.