धोक्याची घंटा ! पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला, अपेक्षित सरासरीच्या 62 टक्केच पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 03:15 PM2017-08-22T15:15:19+5:302017-08-22T15:16:28+5:30

राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ मागे पडला आहे.

 Alarm clock! Rainfall is expected to return to Vidarbha, with the expected average rainfall of 62% | धोक्याची घंटा ! पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला, अपेक्षित सरासरीच्या 62 टक्केच पाऊस

धोक्याची घंटा ! पावसाच्या सरासरीत विदर्भ माघारला, अपेक्षित सरासरीच्या 62 टक्केच पाऊस

Next

अमरावती, दि.22  - राज्यात यंदा आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरीत इतर विभागांच्या तुलनेत विदर्भ मागे पडला आहे. सर्वाधिक ९५.३ टक्के कोकण, नाशिक ९२.२, औरंगाबाद ७९.०, पुणे ७७.५ तर विदर्भातील अमरावती विभागात ६२.९ व नागपूर विभागात ६२.६ टक्केच पाऊस पडला आहे. पावसाच्या १२० पैकी ७२ दिवस संपले असताना सरासरीपेक्षा ३८ टक्के पाऊस कमी असल्याने पुढील काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.

प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्टपासून मध्यम व जोरदार स्वरूपात नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच हवामान विभागाचा अंदाज काही अंशी खरा ठरला. मात्र, अतिवृष्टी न होता हलक्या व मध्यम स्वरूपात पाऊस होत असल्याने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. मात्र, या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता पुरेशी वाढलेली नाही व धरणक्षेत्रात देखील दमदार पाऊस नसल्यामुळे प्रकल्प तहानलेलेच आहेत. विहिरीतील पाण्याची पातळी वाढली नसल्याने यंदाचा रबी हंगाम देखील बाधित होणार आहे.

एक जून ते २१ आॅगस्ट या कालावधीत अमरावती विभागात ५५७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३५० मिमी पाऊस पडला. याविभागात जून महिन्यात १५४ मिमी सरासरी अपेक्षित असताना १३८ मिमी, जुलै महिन्यात सरासरी २६१ मिमी सरासरीची गरज असताना १४७ मिमी व २१ आॅगस्टपर्यंत १४२ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त ६५ मिमी पााऊस पडला आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात ३७१.४ मिमी म्हणजेच ८०.२ टक्के, अकोला ३२७.८ मिमी ६६.९ टक्के, वाशिम ४२२.७ मिमी ७४.९ टक्के, अमरावती ३३६.५ मिमी ५८.९ टक्के तर सर्वात कमी ३२२.१ मिमी म्हणजेच ४९.७ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात पडला आहे. आग्नेय विदर्भ व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र कायम असल्याने आणखी दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.


एक जून ते २१ आॅगस्ट दरम्यान पावसाची स्थिती
* कोकण विभागात २३३७.८ मिमी सरासरी अपेक्षित असताना ९२२२८.९ मिमी पाऊस पडला. ही ९५.३ टक्केवारी आहे.
* नाशिक विभागात ४९१.२ मिमी सरासरी अपेक्षित असताना ४५३ मिमी पाऊस पडला. ही ९२.२ टक्केवारी आहे.
* पुणे विभागात ६४३.४ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४९८.४ मिमी पाऊस. ही ७७.५ टक्केवारी आहे.
* औरंगाबाद विभागात ४८०.७ मिमी पावसाची ३७९.९ मिमी सरासरी अपेक्षित असताना ३५०.८ मिमी पाऊस पडला. ही ७९ टक्केवारी आहे.
* अमरावती विभागात ५५७.४ मिमी पावासाची सरासरी अपेक्षित असताना ३५०.८ मिमी पाऊस पडला. ही ६२.९ टक्केवारी आहे. एकूण ५२५.१ मिमी पाऊस पडला. ही ६२.६ टक्केवारी आहे.

Web Title:  Alarm clock! Rainfall is expected to return to Vidarbha, with the expected average rainfall of 62%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.