सावर्डीजवळ अपघात, तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:52 AM2018-02-09T00:52:05+5:302018-02-09T00:52:52+5:30

टिप्पर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगावपेठ हद्दीतील सावर्डीजवळ घडली. उद्योगपती संजय जाधव यांची मुलगी सई जाधवसह तिघांचा जखमींमध्ये सहभाग आहे.

Accident near Savde, three serious | सावर्डीजवळ अपघात, तिघे गंभीर

सावर्डीजवळ अपघात, तिघे गंभीर

Next
ठळक मुद्देटिप्परवर कार धडकली : जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार

ऑनलाईन लोकमत
अमरावती : टिप्पर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणीसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना नांदगावपेठ हद्दीतील सावर्डीजवळ घडली. उद्योगपती संजय जाधव यांची मुलगी सई जाधवसह तिघांचा जखमींमध्ये सहभाग आहे.
माहितीनुसार, सई जाधव व अन्य तीन जण कार क्रमांक एमएच २७ बीई ५९१३ ने नागपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, सावर्डीजवळील पेट्रोलपंपानजीक त्याच्या कारची टिप्पर क्रमांक आरजे ३८ जीए ११०३ ला धडक बसली. या अपघातात कारमधील चारही जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मालटेकडीजवळ अपघातात तीन गंभीर
बुधवारी रात्री मालटेकडीसमोरील मार्गावर एमएच २७ एस-८०५३ व एमएच २७ बीवाय ९४१४ या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात झाला. या अपघातात गजानन अशोक सपकाळ (रा.अनकवाडी), अब्दुल रहेमान अब्दुल रशीद (रा.चपराशीपुरा) व रोशन किसन शहाकार हे तिघे गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील चौकशी फे्रजरपुरा पोलीस करीत आहे.
सुपर हायवेवर अपघात
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी फे्रजरपुरा हद्दीतील सुपर हायवेवर घडली. विलास रंगराव पोटे (५०,रा. पिंपळखुटा) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Accident near Savde, three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात