विदर्भ एक्स्प्रेसमधून आठ लाख जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:32 AM2019-03-29T00:32:29+5:302019-03-29T00:33:49+5:30

मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून एका बर्थमधून रेल्वे पोलिसांनी ८ लाखांवर रोकड गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जप्त केली. त्यापूर्वी अकोला नाका येथूनही ४ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्तीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

8 lakh seized from Vidarbha Express | विदर्भ एक्स्प्रेसमधून आठ लाख जप्त

विदर्भ एक्स्प्रेसमधून आठ लाख जप्त

Next
ठळक मुद्देरेल्वे पोलिसांची कारवाई : अमरावतीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर?

बडनेरा : मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधून एका बर्थमधून रेल्वे पोलिसांनी ८ लाखांवर रोकड गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास जप्त केली. त्यापूर्वी अकोला नाका येथूनही ४ लाख २ हजार रुपये जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोकड जप्तीच्या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
विदर्भ एक्स्प्रेस गुरुवारी रात्री ८ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर पोहोचताच रेल्वे पोलीस दल व रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने एका बोगीतील बर्थ क्र. ७ वर बसलेल्या उमेश लक्ष्मण सूर्यवंशी (३०, रा. आर्वी नाका, वर्धा) या युवकाला गोपनीय माहितीवरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे असलेल्या तीन कार्टूनची तपासणी केली असता, त्यामध्ये ५००, २००, १०० रुपयांच्या स्वरूपात एकूण ८ लाख १० हजार रुपये आढळून आले. वर्धा येथील अशोकराज कुरियर कंपनीत तो नोकरीला असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम हवालामार्फत मुंबईला नेली जात होती. आरपीएफचे ठाणेदार राजेश बढे, रेल्वे पोलीसचे एपीआय एस.व्ही. वानखडे, पीएसआय बंडू मेश्राम, राहुल हेरोडे, राजेश नागरे यांनी ही कारवाई केली.

अकोला नाका येथे कारमध्ये आढळले चार लाख
बडनेरा ते लोणी मार्गातील अकोला नाका (टी-पॉइंट) येथे गुरुवारी सायकांळी अकोला, वाशीमकडून अमरावतीकडे येणाऱ्या मार्गावर टी-पॉईंट येथे वाहनांची तपासणी सुरू होती. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अकोला येथील बांधकाम कंत्राटदार नरेंद्र बळीराम पांडे (५३) व त्यांचे सहकारी मनोज के.फिलिप्स हे कार क्रमांक एमएच ३० एएफ ९०३६ ने अमरावतीकडे येत असताना भरारी पथकाने कारची झडती घेतली. कारमध्ये ४ लाख २ हजारांची रोकड आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी कार व रोकड जप्त केली. सदरची कारवाई भरारी पथकप्रमुख अक्षय लोहार, पोलीस उपनिरीक्षक संजय आत्राम, विजू गैरवार आदींच्या पथकाने केली. लोकसभेच्या अमरावती मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. शहराच्या आठ सीमांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात रोकड पकडली जात असल्यामुळे येथील लोकसभेच्या निवडणुकीत पैशांचा सर्रास वापर होत असल्याचे स्पष्ट होते. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी तपासणी नाक्यांची संवेदनशीलता आणि क्षमता अधिक वाढविणे इष्ट ठरेल.

Web Title: 8 lakh seized from Vidarbha Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस