शाश्वत स्कूलमध्ये उलगडला ५० दुर्मीळ वनौषधींचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:03 PM2017-11-23T23:03:42+5:302017-11-23T23:05:00+5:30

कॅम्प स्थित शाश्वत कॅन्सेप्ट स्कूलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ५० दुर्मीळ वनौषधींचे दालन विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक व शेतकºयांना खुले केले आहे.

50 rare herbal treasures unveiled in sustainable school | शाश्वत स्कूलमध्ये उलगडला ५० दुर्मीळ वनौषधींचा खजिना

शाश्वत स्कूलमध्ये उलगडला ५० दुर्मीळ वनौषधींचा खजिना

googlenewsNext
ठळक मुद्देविविध आजारांवर रामबाण : प्रदर्शनाला होत आहे नागरिकांचीही गर्दी

संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कॅम्प स्थित शाश्वत कॅन्सेप्ट स्कूलमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित विज्ञान प्रदर्शनामध्ये ५० दुर्मीळ वनौषधींचे दालन विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासक व शेतकºयांना खुले केले आहे. हौशी उद्यानप्रेमींसाठी या रोपांच्या बास्केटचा प्रयोग अभिनव आणि पटकन आकर्षित करणारा आहे.
सेवानिवृत्त वनकर्मचारी संघ महाराष्ट्र (सेवक) च्या अमरावती शाखेने प्रदर्शनात याद्वारे आपली सहभागिता दर्शविली आहे. विद्यार्थ्यांना व नागरिकांना अभ्यास करण्यासाठी तसेच आरोग्यास उपयुक्त ठरणाºया जगभरातील ५० प्रकारच्या दुर्मीळ वनौषधींच्या प्रजातींची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांची रोपेही येथे ठेवली आहेत. त्यामुळे ऐकीव माहितीऐवजी प्रत्यक्ष झाडाचे दर्शन होते. या दालनाला सेवानिवृत्त वनअधिकारी संजय जगताप, विजय भोसले, पी. के. गाडबैल, एस.ए. वाहणे, विशाल निंभोरकर, सतीश गावंडे, देवकिशोर गडपांडे आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. शाश्वत शाळेचे संचालक अतुल गायगोले व अमृता गायगोले यांच्या पुढाकाराने आयोजित या विज्ञान प्रदर्शनाला बच्चेकंपनी व नागरिकांची गर्दी होत आहे.
रक्तचंदन
जगातील सर्वात किमती लाकूृ ड. ही वनस्पती युरेनियम वा इतर किरणोत्सारी मूलद्रव्यांचा किरणोत्सर्ग थांबविण्यास उपयोगी आहे. विद्युत चुबंकीय किरणांचा मानवी शरीरावरील दुष्परिणाम टाळण्याकरिता अत्यंत उपयुक्त असून, शेताच्या बांधावर, पडीक जमिनीवर लागवड केल्यास शेतकºयांना १२-१५ वर्षांमध्ये लाखोंचे उत्पन्न मिळू शकते. डोळ्यांचे आजार, त्वचारोेग, उष्णतेचे विकार, कांजिण्या आदी आजारांवर उपयुक्त आहेत.

अजान वृक्ष
योगवल्ली, दातरंगी किंवा काळा खंडुचक्का म्हणूनही ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी येथील समाधीवर त्यांच्यातर्फे लावण्यात आलेला वृक्ष आपल्या भव्यतेची आणि परिसराच्या दिव्यत्वाची साक्ष देतो. पौराणिक महत्त्व असलेला हा दुर्मीळ बहुगुणी वृक्ष हाड मोडणे, सांधेदुखी , मुका मार, सूज, चर्मरोग, भाजणे, मधुमेह आदी रोगांवर रामबाण आहे. याच्या पानाचे चूर्ण शक्तिवर्धक आहेत. मेळघाट, यवतमाळ जिल्ह्यातही आढळतो.
लक्ष्मीतरू ( सीमारूबा)
तेलबियांचा शोभिवंत वृक्ष. खाद्यतेल, औद्योगिक इंधन, वंगण म्हणून उपयुक्त ठरते. याची साल अतिसारावर प्रभावी आहे. कर्करोगाच्या उपचारादरम्यान होणाºया किमोथेरेपीच्या दुष्पपरिणामांपासून बचाव करतो. दातदुखी, तोंडातील व्रण, हर्पिस यावर अद्भुत व प्रभावी. शेतकºयांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ देणारी वनस्पती असल्यामुळे आध्यामिक गुरू श्री श्री रविशंकर महाराज यांनी ‘लक्ष्मीतरू’ असे नामकरण केले आहे.
हनुमान फळ
या झाडाची पाने व फळे सर्व प्रकारच्या कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते. पानांची व बियांची पेस्ट जखमेवर लावतात व फळे खोकल्यासाठी उपयुक्त ठरतात. कर्नाटकामध्ये सदर वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
गोरखचिंच
समुद्र मंथनात प्राप्त झालेला हाच तो कल्पवृक्ष होय. जगातील सर्वांत महत्त्वाची कार्बन शोषणारी आणि हगवण, अतिसार व आम्लपित्तावर रामबाण औषधी. जीवनसत्त्व ‘क’चा सर्वांत महत्त्वपूर्ण स्रोत असणारे सदर फळ आहे. आफ्रिकेच्या जंगलात आढळणारी वनस्पती आहे.
टेटूृ ( श्योनाक)
दशमुळांतील महत्त्वाची ही वनस्पती. न्यूमोनिया, दमा, खोकला आदींवर रामबाण आहे. मेळघाट काही ठिकाणी, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येणारी वनस्पती आहे. हिची साल पित्तशामक असून, मूत्रविकारावर उपयुक्त ठरते.

Web Title: 50 rare herbal treasures unveiled in sustainable school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.