‘ब्लॅकस्पॉट’ निर्मूलनासाठी २.४५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:22 PM2018-04-20T22:22:43+5:302018-04-20T22:22:43+5:30

जिल्ह्यातील २४ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघातप्रवण स्थळी अपघात होऊच नयेत, यासाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. यात तात्पुरत्या उपाययोजनांवर ११ लाख, तर ‘लाँग टर्म’ उपाययोजनांवर २.३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपाययोजनांवर २३ एप्रिलच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ऊहापोह होणार आहे.

2.45 crore for the elimination of Blackspot | ‘ब्लॅकस्पॉट’ निर्मूलनासाठी २.४५ कोटी

‘ब्लॅकस्पॉट’ निर्मूलनासाठी २.४५ कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देदीर्घकालीन उपाययोजना : जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील २४ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघातप्रवण स्थळी अपघात होऊच नयेत, यासाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. यात तात्पुरत्या उपाययोजनांवर ११ लाख, तर ‘लाँग टर्म’ उपाययोजनांवर २.३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपाययोजनांवर २३ एप्रिलच्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ऊहापोह होणार आहे.
केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी जिल्ह्यातील अपघातप्रवण स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यासाठी मागील तीन वर्षात ज्या स्थळी सर्वाधिक अपघाताच्या घटना घडल्या, ती स्थळे ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित करण्यात आली. जिल्ह्यात अशी २४ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले. या ब्लॅक स्पॉटची यादी परिवहन आयुक्तांमार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली असून, अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना व अपघात होऊच नये, यासाठी दीर्घकालीन उपाययोजना सूचविल्या आहेत.
आष्टी या अपघातप्रवण स्थळासाठी ४५ लाख, जुना बायपास एमआयडीसीसाठी ५० लाख, एसटी बसस्टँड परिसरासाठी ३० लाख, लोणीसाठी ४० लाख, इर्विन चौक शवागृह परिसर व राजापेठसाठी प्रत्येकी तीन लाख रूपये, बेनाम चौक अपघातप्रवण स्थळासाठी दोन लाख, नवाथेसाठी तीन लाख, बेस्ट प्राइजसमोरील परिसरासाठी दोन लाख, साहिल लॉन या ब्लॅक स्पॉटसाठी दोन लाख, कठोरा नाका दोन लाख, तळणी फाटा ५० लाख, तर यवतमाळ टी-जंक्शन दोन लाख अशा एकूण १४ अपघातप्रवण स्थळांच्या निर्मूलनासाठी २.३४ कोटींच्या दीर्घ उपाययोजना सूचविल्या गेल्या आहेत.
अशा आहेत सूचविलेल्या उपाययोजना
आष्टी फाट्याच्या वाहतूक रस्त्याचे वळण ७ ते १० मीटरपर्यंत वाढविणे.
जुन्या बायपासची एक बाजू चौपदरी करणे.
एसटी बसस्टँड परिसरात ट्राफिक सिग्नल.
लोणी येथे वक्र सुधारणा.
इर्विन चौक शवागार परिसरात ट्राफिक सिग्नल, दुभाजकाची लांबी वाढविणे.
नवाथेवर स्पीडब्रेकर, रंगोली पर्लजवळचे ओपनिंग बंद करणे.
बेनाम चौकात रोड सिग्नल, स्पीडब्रेकर, रंगकाम.
राजापेठ-कॉशनरी सिम्बॉल, गतिरोधक.
बेस्ट प्राइजसमोर असलेले डिव्हायडर ओपनिंग ५० मीटर अंतरावर असावे.
साहिल लॉन - गतिरोधक धोकादायक असल्याची मार्किंग.
कठोरा नाका - ट्राफिक सिग्नल
तळणी फाटा वक्र वळणाजवळ - वक्र सुधारणा.
तळणी फाटा - वळण आणि दुतर्फा बस-बे.
यवतमाळ टी जंक्शन - दुभाजकाची अमरावती बाजूने लांबी वाढविणे.

Web Title: 2.45 crore for the elimination of Blackspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.