मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 05:15 PM2018-04-19T17:15:14+5:302018-04-19T17:15:14+5:30

196.92 crore approved for Chief Minister rural drinking water schemes | मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजलसाठी १९६.९२ कोटी, राज्यात १,००३ पाणीपुरवठा योजना राबविणार

Next

 अमरावती  - राज्यात भूजलस्तरात घट झाली आहे. भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, मराठवाडा, विदर्भातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ही दाहकता लक्षात घेत शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण  पेयजल कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ पाणीपुरवठा योजनेकरिता १९६ कोटी ९२ लाख रूपये मंजूर केले आहे.

     पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण पाणीपुरवठा क्षेत्रात सुधारणा करण्याच्या उद्देशाने व ग्रामीण जनतेस स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविला जात आहे. यात एकूण १,००३ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, १७ जानेवारी २०१८ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून २६२ कोटी ६३ लाख ४४ हजार रूपये किमतीच्या ११९ पाणीपुरवठा योजना वगळण्यात आल्या आहेत. या ११९ पाणीपुरवठा योजना अन्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. नव्याने २५ ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला असला तरी कायम पाण्याचे स्त्रोत न तपासता पाणीपुरवठा योजना राबविली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरवर्षी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर हजारो कोेटी रूपये खर्च होत असताना पाण्याची समस्या दूर होत नाही, हे वास्तव आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यापूर्वी कायम पाण्याचे स्त्रोत निवडले जात नाही. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीमार्फत ही योजना राबविली जात असल्यामुळे त्यावर खर्च होणारा निधी व्यर्थ ठरत असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लेखा परीक्षणातून यापूर्वी स्पष्ट झाले आहे. 

 
येथे राबविणार नवीन पाणीपुरवठा योजना

जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, खेडगाव व जालना तालुक्यातील ९२ गावांचा ग्रीड पाणीपुरवठा योजनेत समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील पालम व गंगाखेड तालुक्यातील ६५ गावे ग्रीड पाणीपुरवठा योजनेत आहेत. बीड जिल्ह्यातील दिंद्रुड, औरंगाबादच्या सावरखेड, लातूरचे तळणी तर सांगली जिल्ह्यातील येलूर, नायगाव, शिरगाव, पडवळवाडी, शेखरवाडी, कोळे ही गावे समाविष्ट केली  आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद, उमळवाड, घालवाल, बुबनाळ, राक्षी, धबधबेवाडी, निकमवाडी, पिंपळे, सातवे, जाफळे, कणेरी, शेंबवणे, मानोली, सावर्डे खु., परखंदळे, जाधववाडी, येलूर या गावांचा समावेश आहे.

Web Title: 196.92 crore approved for Chief Minister rural drinking water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.