१२ लाखांवर केळी करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:23 AM2019-06-24T01:23:24+5:302019-06-24T01:25:06+5:30

वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत.

12 lakh bananas are made | १२ लाखांवर केळी करपली

१२ लाखांवर केळी करपली

Next
ठळक मुद्दे२१ जूनच्या वादळातही उद्ध्वस्त : शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : वाढते उन्ह आणि अधिक तापमानामुळे अचलपूर कृषी उपविभागांतर्गत १२ लाखांहून अधिक केळीबागा करपल्या जात आहे. ऐन घड भरलेल्या अवस्थेत हा प्रताप झाल्याने यात शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. २१ जूनच्या वादळातही घडांनी लदबदलेली केळीची झाडे उद्ध्वस्त झालीत. आधी उन्हान आणि आता वादळाने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अचलपूर कृषी उपविभागांतर्गत अचलपूर तालुक्यातील ३८० हेक्टर क्षेत्रांपैकी १८७.७७ हेक्टर क्षेत्रावरील केळी करपली, तर अंजनगाव तालुक्यातील ४५१ हेक्टरपैकी २१७ हेक्टर क्षेत्रातील केळी वाढते तापमान आणि उन्हामुळे भाजल्या गेली. केळीचे घड बरोबर निसवले नाहीत. केळीच्या घाडांची संख्या कमी असून घडातील वरच्या फण्याही करपल्या आहेत.
२१ जूनच्या तुफान वादळामुळे केळीच्या झाडांची पाने फाटली आहेत. दोन्ही तालुक्यातील केळीचे बहुतांश पीक यात खराब झाले आहे. दरम्यान २१ जूनच्या सायंकाळी वादळाने केळीची झाडे घडांसह जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील चमक येथील सरला सुखदेव पवार यांच्या ८० आर शेतातील संपूर्ण केळी वादळाने झोपली. चमकसह हरम, खानापूर, नवबाग, शहापूर, दारापूर शिवारात प्रचंड नुकसान झाले. सदर नुकसानाचे सर्वेक्षण करून शेतकºयांना भरपाई देण्याची मागणी होत आहे.

असे झाले नुकसान
अचलपुरतील वेणी येथील मंगेश बुंदेले यांच्या शेतातील ४ हजार केळीची झाडे, प्रल्हाद बदुकले यांच्या शेतात तीन हजार, वडगाव फत्तेपूर येथील सुंदरलाल चौधरी यांच्या शेतातील तीन हजार, तर अंजनगावमधील पांढरी खानापूर येथील रवींद्र डाबरे यांच्या शेतातील ३ हजार २५ केळीची झाडे उन्हामुळे करपल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विशेष तज्ज्ञांनी आपल्या पाहणी अहवालात म्हटले आहे.

विशेषतज्ज्ञांचा अभिप्राय
अधिक तापमानामुळे बागेतील तापमान वाढले. आर्द्रता कमी झाली. बाष्पीभवनाचा वेग वाढला. याचा परिणाम झाडांच्या वाढीवर झाला. घड बरोबर निसवले नाहीत. जे घड निसवलेत त्याच्या वरील बाजूच्या फण्यासुद्धा तीव्र सूर्यप्रकाशामुळे करपल्याचा अभिप्राय कृषी विद्यापीठासह कृषी विभागातील विशेष तज्ज्ञांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची मागणी
मोठ्या प्रमाणावर केळी पिकांचे नुकसान झाल्यामुळे केळी पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे हवालदिल शेतकºयांनी केळी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याकरिता अचलपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व अंजनगाव तहसीलदारांकडे शेतकºयांसह राजकीय, सामाजिक मंडळींनी निवेदने दिली आहेत.

Web Title: 12 lakh bananas are made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.