अमरावती जिल्ह्यात संत्रा बागायतदारांचे ११०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 10:13am

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वातावरणाचा बदल कारणीभूत : वीरेंद्रकुमार जोगी। आॅनलाईन लोकमत अमरावती : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ अशी ओळख असलेल्या वरूड-मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादकांना यंदा ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. राजस्थान व पंजाबच्या किन्नूचे उत्पादन कमी असल्याने भाव वधारले असले तरी त्याचा फायदा येथील उत्पादकांना मिळू शकत नसल्याचे चित्र आहे. १९८२ साली आलेल्या कोळशी रोगामुळे हजारो हेक्टरमधील संत्राबागा नष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारच्या योजना व संत्रा उत्पादकांच्या जिद्दीमुळे मागील काही वर्षांत संत्राबागा जगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. साधारणत: १ हेक्टरमध्ये सरासरी १० टन संत्रा उत्पादन होते. मागील काही वर्षांत सरासरी २० हजार रुपये टन असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यानुसार जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टरमध्ये ११०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मात्र यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने नुकसान झाले आहे. एकेकाळी देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी संत्री खरेदीसाठी वरूडमध्ये येत होते. राजस्थान व पंजाबातही संत्राबागा यशस्वी ठरल्याने व्यापाऱ्यांचा कल तिकडे वाढता झाला. मात्र यंदा पंजाबचा किन्नू व राजस्थानमध्येही संत्री उत्पादन नसल्याने बाजारपेठेत भाव वधारले आहेत. त्याचा फायदा मात्र शेतकºयांना मिळू शकत नसल्याचे वास्तव आहे.  

संबंधित

१२ टक्क्यांनी धान खरेदी घटली
सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश
जिल्ह्यातील शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर खरेदी अडचणीत : चार वर्षांपासून निधी नाही
प्रशासनाचे पत्र : गोशाळा पांजरापोळचे गुदाम उपलब्ध गुरुवारपासून मका खरेदी
 कर्जमाफी योजनेबाबत नाराज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी

अमरावती कडून आणखी

तरुणीवर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव, आरोपीवर बलात्कारासह अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा
VIDEO : पोलिसाला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू दोषी, सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा
पोटेंची निवडणूक अन् गडकरीपुत्राचा खुलासा
मामीसाठी भाच्यानेच केला मामाचा ‘गेम’
पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

आणखी वाचा