रतनलाल प्लॉट चौकात युवकाची गळफास घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:02 PM2019-06-30T17:02:08+5:302019-06-30T17:02:14+5:30

अमर बेलखेडे या मनमीळाउ स्वभावाच्या युवकाचा रतनलाल प्लॉट चौकातील रोहीत्राला गळफास घेतलेल्या स्थीतीत  मृतदेह आढळल्याची घटना रविवारी पहाटे घडली.

Youth's Suicide in Ratanlal Plot Chowk Akola | रतनलाल प्लॉट चौकात युवकाची गळफास घेउन आत्महत्या

रतनलाल प्लॉट चौकात युवकाची गळफास घेउन आत्महत्या

Next

अकोला : सातव चौकातील एका अपार्टमेंटमधील रहिवासी तसेच याच परिसरात कट्टाप्पा नावाच्या प्रतिष्ठानमधून मासविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अमर बेलखेडे या मनमीळाउ स्वभावाच्या युवकाचा रतनलाल प्लॉट चौकातील रोहीत्राला गळफास घेतलेल्या स्थीतीत  मृतदेह आढळल्याची घटना रविवारी पहाटे घडली. या युवकाने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. मात्र त्याची पत्नी काही दिवसांपुर्वी मृत्यू पावल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
रामदासपेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाºया रतनलाल प्लॉट स्थित विद्युत खांबाला रविवारी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन एका युवकाचा मृतदेह लटकलेला असल्याची माहिती रामदासपेठ पोलिस ठाण्याचे ठाणेदार शैलेश सपकाळ याना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून तपास केला असता सदर युवकाचे नाव अमर बेलखेडे असून, शहरातील जठारपेठ परिसरातील बिर्ला कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. अमर बेलखेडे यांचे रेवती तायडे या वकील असलेल्या मुलीसोबत दिड वषार्पूर्वी लग्न झाले होते. मात्र दुदैर्वाने पत्नीला कँसर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासले व त्यांची प्राणजोत गेल्या तीन महिन्यांपूर्वी मालवली होती. पत्नीचे अचाणक निधन झाल्याने गत तीन महिन्यांपासून पत्नी विरहात जीवन जगत असतांनाच अमरला नैराश्याने ग्रासले होते. याच नैराश्यातून त्याने टोकाचा निर्णय घेत गळफास लाउन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमरचा मृतदेह रतनलाल प्लॉेट चौकातील एका विद्युत रोहीत्राला लटकलेला होता. त्याच बाजुला अमरची दुचाकीही उभी होती. रामदास पेठ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास रामदासपेठ पोलिस करीत आहेत.
 
चिठ्ठीत सात जनांची नावे
अमर बेलखेडे यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्या चिठ्ठीत सात जनांची नावे असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. या सात जनांनी अमरला चांगली मदत केली असून पैशाचीही मदत त्यांनी केली आहे. त्यामुळे या सात जनांचे पैसे देण्यात यावे तसेच त्याची दुचाकी त्याच्या अत्यंत जवळच्या मीत्राने वापरावी असे चिठ्ठीत लिहीलेले असून ही चिठ्ठी त्याने वडीलांना उद्देशून लिहील्याची माहिती आहे.

 

Web Title: Youth's Suicide in Ratanlal Plot Chowk Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.