विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू!
मानोरा : तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील साखरडोह येथील वीस वर्षिय युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुका परशराम भगत हा युवक शेतशिवारात असलेल्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी हेमेंद्र दिगांबर कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मानोरा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास बिट जमादार सुभाष महाजन, संदीप बरडे करीत आहेत.