युवक काँग्रेस निवडणूक;  अकोला जिल्हाध्यपदी महेश गणगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:37 PM2018-09-14T13:37:16+5:302018-09-14T13:37:23+5:30

अकोला : युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत जिल्हा स्तरावरील पदांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये जिल्हाध्यपदी महेश गणगणे निवडून आले.

Youth Congress election; Mahesh Gangaane district president of Akola | युवक काँग्रेस निवडणूक;  अकोला जिल्हाध्यपदी महेश गणगणे

युवक काँग्रेस निवडणूक;  अकोला जिल्हाध्यपदी महेश गणगणे

Next

अकोला : युवक काँग्रेसच्या विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या पक्षांतर्गत निवडणुकीत जिल्हा स्तरावरील पदांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये जिल्हाध्यपदी महेश गणगणे निवडून आले. गणगणे यांना १४०१ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी निनाद मानकर यांना ९५५ मते मिळाली असून, त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षासोबतच जिल्हा महासचिव, विधानसभा अध्यक्ष यांचेही निकाल जाहीर झाले आहेत. शहर जिल्हाध्यक्षपदी अंशुमन देशमुख निवडून आले असून, शहराच्या उपाध्यक्षपदी सुमती गवई, राहुल सारवान व अश्विन शिरसाट यांची निवड झाली आहे. शहर महासचिव पश्चिम विभाग शेख अब्दुल्ला व पूर्व विभाग कीर्ती देशमुख हे दोघे निवडून आले आहेत. जिल्हा महासचिवपदी मयूर निमकर निवडून आले आहेत. अकोला पूर्व विधानसभा अध्यक्षपदी अमोल काळणे निवडून आले असून, पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी फैजल खान, बाळापूर विधानसभा अध्यक्षपदी साजीद इक्बाल, मूर्तिजापूर विधानसभा अध्यक्षपदी मो. शहाबोद्दीन तर अकोट विधानसभा अध्यक्षपदी अक्षय गणोरकर यांनी या निवडणुकीत बाजी मारली. पूर्व विभागाच्या शहर महासचिवपदी अंशुमन देशमुख निवडून आले आहेत.

गणगणे गटाचे वर्चस्व कायम
अकोला - युवक काँग्रेसच्या संघनात्मक निवडणुक प्रतिष्ठेची झाली होती. महेश गणगणे यांचे विरुद्ध इतर सर्व गट असे चित्र होते. गणगणे यांना पराभूत करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. परंतु गणगणे यांनी त्या सर्वांवर मात करीत विजयी खेचून आणला आणि विरोधकांना जबरदस्त धक्का दिला.या निवडणुकीत महेश गणगणेच्या विरोधात पराभूत झालेला निनाद मानकरची निवड नियमानुसार ऊपाध्यक्ष पदावर झाली. विशेष म्हणजे अकोट विधानसभा मतदार संघ अध्यक्षपदासाठी माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांचा मुलगा प्रविण बोडखे यांनी निवडणुक लढविली मात्र ते पराभुत झाले या पदासाठी गणगणे गटाचे गणोरकार निवडुन आले. प्रवीण बोडखे यांना दूसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने त्यांची अकोट उपाध्यक्षपदी वर्णी लागली

 

Web Title: Youth Congress election; Mahesh Gangaane district president of Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.