अकोला जिल्हा : धामणा येथील युवा शेतकऱ्याची कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:45 PM2018-01-17T17:45:29+5:302018-01-17T17:48:30+5:30

उरळ : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून धामणा येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी घडली. गणेश विक्रम खारोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

A young farmer committed to suicide | अकोला जिल्हा : धामणा येथील युवा शेतकऱ्याची कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या

अकोला जिल्हा : धामणा येथील युवा शेतकऱ्याची कर्ज, नापिकीला कंटाळून आत्महत्या

Next
ठळक मुद्देधामणा येथील गणेश खारोडे यांच्याकडे नऊ एकर शेती आहे.त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गांधीग्राम येथून दीड लाख रुपयांचे कर्ज काढलेले आहे.गणेश खारोडे यांनी १६ जानेवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली.

उरळ : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून धामणा येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी घडली. गणेश विक्रम खारोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
धामणा येथील गणेश खारोडे यांच्या नऊ एकर शेती आहे. त्यांनी या शेती मशागती आणि इतर कामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गांधीग्राम येथून दीड लाख रुपयांचे कर्ज काढलेले आहे. त्यांना शेतीत गेल्या काही वर्षांपासून अपेक्षीत उत्पन्न झाले नाही. यावर्षीही अल्प उत्पादन झाल्याने कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत गणेश खाराडे यांनी १६ जानेवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. गणेश यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, पाच बहीणी असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस स्टेशनचे बीट जमादार गजानन ढोणे, पो.ना. विजय चव्हाण यांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठवले. या प्रकरणी उरळ पोलिसांनी अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे.

Web Title: A young farmer committed to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.