दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट; हरणाच्या कळपाने पिके केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 03:16 PM2019-07-15T15:16:10+5:302019-07-15T15:16:19+5:30

अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे.

Wildfire crisis in farmers during drought | दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट; हरणाच्या कळपाने पिके केली फस्त

दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे संकट; हरणाच्या कळपाने पिके केली फस्त

Next

- विजय शिंदे
अकोटःअकोट तालुक्यातील शेतीचा मोठा भाग खारपाणपट्ट्यात येत आहे या खारपाणपट्टा मध्ये मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप शेतातील पिके फस्त करत आहेत. त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांचे नवे संकप ओढावले आहे.
अकोट तालुक्यात खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर, मुंग, कपाशीचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे.शेतामध्ये बियाणे अंकुरलेले आहेत. या कोवळ्या अंकुरलेल्या पिकांवर हरिण व काळविट ताव मारत आहे. एका कळपामध्ये साधारण 3्३० ते ४० हरणांचा समावेश आहे. त्यामुळे रातोरात हे कळप पिके फस्त करत आहेत. तर पेरणी केलेल्या शेतांमध्ये हे कळप घुसत असल्याने पेरलेले बियाणे अस्तव्यस्त होत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रासलेला आहे.  हरणाचे कळपामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतीवर पहारा द्यावा लागत आहे. आधीच दुष्काळ सदृश्य स्थिती असताना शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन शेतीची पेरणी केली. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत असताना हरणाचा कळप आणि मात्र शेतातील पिके फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे  वन्य प्राण्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याकरीता शासनाने पावले उचलावी. अन्यथा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Wildfire crisis in farmers during drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.