तुमचे आमचे नाते काय.. ‘जय जिजाऊ -जय शिवराय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 03:05 AM2018-02-20T03:05:00+5:302018-02-20T03:06:28+5:30

अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.

What is your relationship with you? 'Jai Jijau-Jay Shivrai' | तुमचे आमचे नाते काय.. ‘जय जिजाऊ -जय शिवराय’

तुमचे आमचे नाते काय.. ‘जय जिजाऊ -जय शिवराय’

googlenewsNext
ठळक मुद्देशिवजयंतीनिमित्त शहरात मिरवणूक विविध देखाव्यांनी वेधले अकोलेकरांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरात मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने सोमवारी दुपारी शिवाजी पार्क परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला, पुरुष व तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहात सहभागी झाल्या होत्या.
सकाळी शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी यांच्या पुतळय़ास शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकार्‍यांनी हारार्पण करून नागरिकांना शुभेच्छा दिल्यात. दुपारी  शिवाजी पार्क परिसरातून शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ास वंदन करून भव्य शोभायात्रा प्रारंभ झाली. परिसरात शिवशाहीचे वातावरण तयार करण्यात आले होते. आकर्षक रथात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी येसूबाई यांचे देखावे साकार करण्यात आले होते. रथ, अश्‍व, छत्र, चामर, ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला. यावेळी आ. गोपीकिसन बाजोरिया, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, समितीचे अध्यक्ष कृष्णा अंधारे, डॉ. अभय पाटील, अविनाश नाकट, अशोक पटोकार, अविनाश देशमुख, पवन महल्ले, जगदीश मुरूमकर, संदीप पाटील, संग्राम गावंडे, प्रकाश तायडे, मनोज तायडे, प्रदीप वखारिया, नगरसेवक मंगेश काळे, पंकज साबळे, कपिल रावदेव, नीलेश वानखडे, योगेश थोरात, विलास शेळके, आशिष पवित्रकार, प्रदीप वाघ, विनायकराव पवार, जिजाऊ ब्रिग्रेडच्या इंदुताई देशमुख, जयश्री  भुईभार, पूनम पारसकर,    डॉ. सीमा तायडे, भालतिलक आदींची उपस्थिती होती. शिवाजी पार्क, अकोट स्टॅन्ड, दामले चौक, अग्रसेन चौक, धिंग्रा चौक येथून वाजतगाजत येऊन या शोभायात्रेचा डॉ. आंबेडकर खुले नाट्यगृह येथे समारोप करण्यात आला. 
या शोभायात्रेत बबलू बच्चेर, आकाश कवडे, आनंद सुकळीकर, चेतन ढोरे, वैभव माहोरे, हर्षल देशमुख, अभिजित मोरे, संजय सूर्यवंशी, मुकेश माळी, रामेश्‍वर पवळ, सागर तिवारी, नितीन सपकाळ, मुन्ना यादव, डॉ. संदीप चव्हाण, रहेमान बाबू, राहुल लोहिया, देवीलाल तायडे, दिनेश लोहोकार, विनोद राऊत, हारून शहा, अँड. ओम खंडारे, शरद टाले, नाझीम लीडर, राजीव इटोले, आनंद वानखडे, गणेश कळसकर, इस्माइल ठेकेदार, सुनील रत्नपारखी, महेंद्र सुतार, प्रकाश सोनोने, नंदरत्न खंडारे समवेत महिला -पुरुष व युवाशक्ती सहभागी झाली होती.

शिवनेरी, रायगड किल्ले ठरले आकर्षणाचे केंद्र
या मिरवणुकीत जनअभियान संघटनेचे शिवनेरी किल्ला व रायगड किल्ल्याचे देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. शिवनेरी किल्ल्याच्या देखाव्यात माँ जिजाऊंच्या पेहरावात मराठी चित्रपट अभिनेत्री त्रिशा पाटील सहभागी झाली होती. शिवसेना नगरातील जय भवानी गोंधळी मंडळाची वाघ्या मुरळीची साथ संगत शिवकालीन प्रसंगाची साक्ष देणारी ठरली. या शोभायात्रेत युवक-युवतींचे संच, बालक-बालिकांनी बाल शिवाजींचा व जिजाऊंचा पेहराव करून सहभाग घेतला. जिल्हा कराटे संघाच्या बच्चे कंपनीची प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली.

Web Title: What is your relationship with you? 'Jai Jijau-Jay Shivrai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.