विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : मोहित राऊतच्या नाबाद १४४ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 08:05 PM2018-02-16T20:05:56+5:302018-02-16T20:09:55+5:30

अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले.

Vijay Telang Smruti trophy Inter-city Cricket Tournament : Mohit Raut scored 144 not out | विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : मोहित राऊतच्या नाबाद १४४ धावा

विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धा : मोहित राऊतच्या नाबाद १४४ धावा

Next
ठळक मुद्देक्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेलाअकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविलामोहित राऊत व गणेश भोसले ठरले विजयाचे शिल्पकार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी विजय तेलंग स्मृती चषक आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील सामना अकोला व भंडारा जिल्हा संघात खेळला गेला. अकोला संघाने भंडारावर १३९ धावांनी विजय मिळविला. मोहित राऊत व गणेश भोसले विजयाचे शिल्पकार ठरले.
अकोला संघाने प्रथम फलंदाजी करीत ५0 षटकांत ५ बाद ३४४ धावांचा डोंगर उभारला. सलामीचा फलंदाज प्रणव आठवलेने शानदार सुरुवात करीत अर्धशतक झळकावले. यानंतर फलंदाजीला उतरलेल्या अंकुश वाकोडे आणि नयन चव्हाण खेळपट्टीवर फार वेळ टिकू शकले नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या पवन परनाटे याने डाव सावरला. पवनने ५१ धावांचे योगदान दिले, तर मोहित राऊतने तडाखेबाज फलंदाजी करीत नाबाद १४४ धावा काढल्या. अक्षय राऊतने १४ धावांचे योगदान दिले. तसेच बंटी क्षीरसागरने नाबाद ५0 धावा काढल्या. अकोला संघाने तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. 
भंडारा संघाकडून कल्पेश राजपूत याने तीन गडी बाद केले. गोविंद मोहता व विप्पन सिंगने प्रत्येकी १ गडी बाद केला. भंडारा संघाची सलामीची जोडी प्रज्वल खोडके याने ७७ आणि उपदेश राजपूत याने ६१ धावा केल्या. अन्य फलंदाज अकोला संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर पटापट तंबूत परतले. द्रुतगती गोलंदाज गणेश भोसलेने चार गडी बाद केले. इम्रान कमाल, मयूर बडे, अक्षय राऊत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मोहित राऊतने गोलंदाजीतही कमाल करू न २ गडी बाद केले.

Web Title: Vijay Telang Smruti trophy Inter-city Cricket Tournament : Mohit Raut scored 144 not out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.