‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 04:04 PM2018-04-21T16:04:42+5:302018-04-21T16:04:42+5:30

व्यापारी-उद्योजकांना येत असलेल्या प्रत्यक्ष अडचणीबाबतचे मत जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभिप्राय नोंदविले जाणार आहे.

Video conference calls for 'GST' issue | ‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय!

‘जीएसटी’च्या अडचणीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नोंदविणार अभिप्राय!

Next
ठळक मुद्देजीएसटी अधिकारी, वितरक आणि करप्राप्ती करणाऱ्यांसह सर्वांचे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. सकाळी १० ते १०.४५ या वेळात जीएसटी रिफंडबद्दल जे.सी.चे कुलगुरू अभिप्राय ऐकणार आहेत.


अकोला : वस्तू व सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी देशभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ई-वे बिलिंगही त्यातीलच एक भाग आहे. व्यापारी-उद्योजकांना येत असलेल्या प्रत्यक्ष अडचणीबाबतचे मत जाणून घेण्यासाठी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. यासाठी २१ एप्रिल रोजी दोन विभागात व्हिडीओ कॉन्फरन्स होणार असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जीएसटी अधिकारी, वितरक आणि करप्राप्ती करणाऱ्यांसह सर्वांचे अभिप्राय नोंदविले जाणार आहे. सकाळी १० ते १०.४५ या वेळात जीएसटी रिफंडबद्दल जे.सी.चे कुलगुरू अभिप्राय ऐकणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ ते संध्याकाळपर्यंत डीलर्स आणि कर व्यवसायी शाखेचे पदवीधर ईसीएसटी फार्म प्राप्त करण्याबाबतच्या अडचणी समजून घेतील. त्यात पीटीआर, रिटर्न भरणे, पीटी पेमेंट करणे, एसएपीमध्ये प्रोफाइल तयार करणे यावर चर्चा होईल. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये होण्यासाठी ट्रेड सभा, करप्रचारक संघटना आणि नोडल आॅफिसचे प्रतिनीधीही यांनाही आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Video conference calls for 'GST' issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.