विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा-मुर्तीजापूरदरम्यान दोन तास खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:50 AM2018-11-23T11:50:44+5:302018-11-23T12:00:17+5:30

कुरूम (अकोला) : मुंबईहून नागपूरला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या भुसावल मंडळ अंतर्गत येत असलेल्या तसेच मुर्तिजापुर ते बडनेरा दरम्यान कुरुम रेलवे स्टेशन वर शुक्रवारी सकाळी दोन तास खोळंबली होती.

Vidarbha Express stop two hours between Badnera-Murtijapur station | विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा-मुर्तीजापूरदरम्यान दोन तास खोळंबली

विदर्भ एक्स्प्रेस बडनेरा-मुर्तीजापूरदरम्यान दोन तास खोळंबली

googlenewsNext
ठळक मुद्देविदर्भ एक्सप्रेस हि गाडी सकाळी ७:१५ ला कुरूम रेल्वे स्टेशनवरून नागपूरकडे रवाना होणार होती. कुरूम यार्ड वर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीला डाउन लुप लाईनवर थांबविण्यात आले. या गाडी मागे धावणाºया ६ सुपरफास्ट रेल्वे गाड्याना कुरूम वरून समोर रवाना केल्या नंतर अकोल्यावरून दुसरे इंजिन बोलावले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
कुरूम (अकोला) : मुंबईहून नागपूरला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस इंजनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या भुसावल मंडळ अंतर्गत येत असलेल्या मुर्तिजापुर ते बडनेरा दरम्यान कुरुम रेलवे स्टेशन वर शुक्रवारी सकाळी दोन तास खोळंबली होती. यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले. विशेष म्हणजे, अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे यांना अखेर स्वत:चे वाहन बोलावून अमरावतीकडे जावे लागले. 
 रेल्वे सुत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार मुंबईवरून नागपुरकडे जाणारी सुपरफास्ट विदर्भ एक्सप्रेस हि गाडी सकाळी ७:१५ ला कुरूम रेल्वे स्टेशनवरून नागपूरकडे रवाना होणार होती.यादरम्यान कुरूम यार्ड वर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने या गाडीला डाउन लुप लाईनवर थांबविण्यात आले. या गाडी मागे धावणाºया ६ सुपरफास्ट रेल्वे गाड्याना कुरूम वरून समोर रवाना केल्या नंतर अकोल्यावरून दुसरे इंजिन बोलावले. हे इंजिन विदर्भ एक्स्प्रेसला लावून ८:३० वाजता बडनेराकडे रवाना करण्यात आली. यामुळे रेल्वे कर्मचाºयांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

अमरावतीचे पालकमंत्री अडकले
मुंबईहून येणाºया विदर्भ एक्स्प्रेसमध्ये अमरावतीचे पालकमंत्री प्रविण पोटे हे देखील प्रवास करीत होते. कुरुम स्थानकावर विदर्भ एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पालमंत्र्यांना ताटकळत बसावे लागले. अखेर त्यांनी स्वत:चे वाहन कुरुम स्थानकावर बोलावून घेतले व त्यानंतर ते अमरावतीकडे रवाना झाले.

Web Title: Vidarbha Express stop two hours between Badnera-Murtijapur station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.