हेल्मेट वापरा जनजागृतीसाठी माहितीपट : अकोला जिल्हाधिकार्‍यांनी केला रस्त्यावर अभिनय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 09:37 PM2017-12-31T21:37:40+5:302017-12-31T21:44:28+5:30

अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली.

Use helmet to document public awareness: Akola District Collector's acting on the road! | हेल्मेट वापरा जनजागृतीसाठी माहितीपट : अकोला जिल्हाधिकार्‍यांनी केला रस्त्यावर अभिनय!

हेल्मेट वापरा जनजागृतीसाठी माहितीपट : अकोला जिल्हाधिकार्‍यांनी केला रस्त्यावर अभिनय!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे स्वत: माहितीपटात भूमिका वठवित आहेतसरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी केले अशोक वाटिकेसमोर चित्रीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे दुचाकीवरून अशोक वाटिकेजवळील सिग्नलवर पोहचले, डोक्यावर हेल्मेट, रेड सिग्नल सुरू असल्याने त्यांनी आपली गाडी बंद करून सेल्फी घेतली. जिल्हाधिकारी हे काय करत आहेत, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. जिल्हाधिकार्‍यांच्या प्रसिद्धीसाठी हा कुठलाही स्टंट नव्हता, तर वाहनधारकांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्यासाठी अकोल्यात निर्मित होत असलेल्या एका माहितीपटामध्ये जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय हे स्वत: भूमिका वठवित आहेत. त्यासाठी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दुपारी अशोक वाटिकेसमोर चित्रीकरण करण्यात आले.  
अशोक वाटिकेलगतच्या पेट्रोलपपांवर जिल्हाधिकार्‍यांची शासकीय गाडी उभी झाल्याने आधी अनेकांना कारवाई असल्याची शंका आली. अनेकांनी तर पेट्रोल पंपावर धाड पडल्याचेही जाहीर करून टाकले. जिल्हाधिकारी रस्त्यावर असल्याचे समजताच अकोल्यातील मीडियाने घटनास्थळावर धाव घेतली.  नागरिकांनही गर्दी केली मात्र खुद्द जिल्हाधिकारीच दुचाकीवर हेल्मेटसह निघाल्यावर माहितीपट चित्रीत करणार्‍याचे कॅमेर ऑन झाले अन् सारा प्रकार लक्षात आला. हेल्मेट वापरण्यासंदर्भात निर्माण केल्या जात असलेल्या माहितीपटाचे चित्रीकरण रविवारी करण्यात आले. यावेळी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक विलास पाटील आणि त्यांची ‘टीम’देखील अशोक वाटिका चौकात होती. ड्रोनने सुरू असलेल्या या शूटिंगसाठी  जिल्हाधिकार्‍यांना अनेकवेळा या चौकातूून त्या चौकात रिटेक करावा लागला.

Web Title: Use helmet to document public awareness: Akola District Collector's acting on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.