प्रकाश आंबेडकर म्हणतात, आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी

By Atul.jaiswal | Published: June 4, 2019 01:03 PM2019-06-04T13:03:51+5:302019-06-04T15:46:25+5:30

आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.

upcoming Vidhan Sabha election golden chance for Raj Thackeray - Prakash Ambedkar | प्रकाश आंबेडकर म्हणतात, आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी

प्रकाश आंबेडकर म्हणतात, आगामी विधानसभा निवडणूक ही राज ठाकरेंना सुवर्णसंधी

googlenewsNext
ठळक मुद्देराज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना ‘कोमा’त आहे.

अकोला : आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेसह विविध राजकीय मुद्द्यांवर बातमीदारांशी चर्चा केली. आपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना आंबेडकर म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.

त्यानुसार शिवसेना १३५ आणि भाजपाचे मित्र पक्ष १५३ जागांवर लढणार आहेत. लोकसभा निवडणुकी शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले असले, तरी शिवसेना ‘कोमा’त आहे. शिवसेना आणि मनसे यांना मतदान करणाऱ्यांची मानसिकता सारखी असल्यामुळे ज्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार लढणार नाहीत, त्या जागांवर मनसे आपली ताकद पणाला लावून शिवसेनेची मते ‘कॅश’ करू शकतात. मनसेला पुनरागमन करण्यासाठी ही शेवटची सुवर्णसंधी ठरेल, असे आंबेडकर म्हणाले.

 

Web Title: upcoming Vidhan Sabha election golden chance for Raj Thackeray - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.