Unidentified youth found dead in Akot city | अकोट शहरातून बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळला!

ठळक मुद्देखुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला युवकाचा मृतदेह 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : शहरातून बेपत्ता झालेल्या छगन वानखडे या २८ वर्षीय युवकाचा मृतदेह  खुदावंतपूर शेतशिवारातील विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत ७ डिसेंबर रोजी  आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी वेस येथील छगन  पांडुरंग वानखडे हा युवक २ डिसेंबर रोजी बकर्‍याचा चारा आणण्याकरिता जंगलात  जातो असे सांगून गेला होता; परंतु तो घरी परतला नाही. त्यामुळे नातेवाईकांसह  सर्वत्र शोधाशोध केली असता, आढळून आला नाही. अशा आशयाची फिर्याद  पांडुरंग महादेव वानखडे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला नोंदविली होती.  त्यावरुन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी बेपत्ता युवकाची शोधपत्रिका जारी  केली होती. परंतु तब्बल सहा दिवसानंतर ७ डिसेंबरच्या सकाळी खुदावंतपूर शे तशिवारातील विहिरीमध्ये छगन वानखडे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत  आढळून आला. या प्रकरणी अकोट  ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घे तली आहे.

अकोटात घरफोडी; ४0 हजारांचा ऐवज लंपास
अकोट येथील टेकडीपुरा येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून, ४0 हजार ४५0  रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी उघडकीस आली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकडीपुरा येथील उमेरा खातेमा शेख काबुल या  आपल्या आईसोबत कारंजा लाड येथे ३0 नोव्हेंबर रोजी लग्नाला गेल्या होत्या. या  लग्नात असताना त्यांच्या भावाने त्यांना घराचा दरवाजा, कुलूप कोंडा तुटलेला  असल्याची माहिती दिली. त्यावरून त्यांनी अकोट येथील घर गाठले असता अज्ञात  चोरट्याने घर फोडून लोखंडी अलमारीमधील रोख २0 हजार रुपये व सोन्याचे २0  हजार ४५0 रुपये किंमतीचे दागिने, असा एकूण ४0 हजार ४५0 रुपयांचा ऐवज  चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणी अकोट शहर पोलिसात अज्ञात आरो पीविरुद्ध भादंविच्या ४५४, ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.