कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 06:35 PM2018-03-19T18:35:28+5:302018-03-19T18:35:28+5:30

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

Uncertainty of cotton prices, rates of sliding down | कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

googlenewsNext
ठळक मुद्देदेशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे. आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.



अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.
देशात आतापर्यंत २ कोटी ८५ लाख गाठी कापसाची आवक झाली असून, महाराष्ट्रात जवळपास ६१ लाख गाठी कापूस खरेदी झाला आहे.मार्च महिना असल्याने शतकऱ्यांना पैशांची निंतात गरज आहे. तसेच बºयाच दिवसापासून कापूस घरात, गोदामात साठवून ठेवला होता. त्यापासून खाज व इतर आजाराची शक्यता वाढल्याने शेतकºयांनी कापूस विक्रीला काढला असून आजमितीस देशात दररोज १ लाख ६५ हजार क्विंटल  कापसाची आवक आहे. कापसाचे प्रति क्विंटल  दर मात्र कमी आहेत. अत्यंत चांगल्या दर्जाच्या कापसाला सद्या बाजरात ४,७०० ते ४,८०० रू पये प्रति क्विंटल  दर असून, हलका दर्जाच्या कापसाला ३,९०० ते ४,२०० रू पये प्रति क्विंटल  दर आहेत.सरकीचे दरही घटले आहेत. मागीलवर्षी मार्च महिन्यात सरकीचे प्रति क्विंटल दर हे २,२०० रू पयांच्यावर आहेत. तर आजमितीस हे दर प्रति क्विंटल  १,४५० ते १,५०० रू पये आहेत.सरकीचे दर जरी वाढले असते तर कापसाच्या दरात वाढ झाली असती पण सर्वच शेतमाल दरावर परिणाम झाला आहे.
बँक घोटाळ््याचा परिणाम लघू ,मध्यम उद्योजक, कापड गिरणी, जिनींग संचालक,व्यापाºयांवर झाले आहेत. १५ मार्चला या सर्वांनी आयकर भरला असून, २० मार्च जीएसटी भरावा लागणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे सर्व यंत्रणा जाम झाली असल्याने पक्कामालही घेण्यात कोणी तयार नाही.त्यामुळेच मंदी सर्वत्र मंदीचे सावट आहे.

कापड,जीनींग,उद्योजक, व्यापºयांना आता सहजासहजी कर्ज मिळणे कठीण झाल्याने हातात पैसा नाही, त्याचा परिणाम शेतमाल दरावर झाला आहे. त्यामुळे सद्या तरी कापसाचे दर वाढणे शक्य नाही असे चित्र आहे.
बसंत बाछुका, कापूस उद्योजक, अकोला.

Web Title: Uncertainty of cotton prices, rates of sliding down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.