तुकाराम महाराज गाथा सप्ताहानिमीत्त कौलखेड परिसरात भव्य शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 06:34 PM2018-02-21T18:34:53+5:302018-02-21T18:41:11+5:30

अकोला-वारकरी संप्रदायाची महती गत अठ्ठावीस वर्षांपासून सातत्याने समाजात प्रवाहित करणाºया कौलखेड परिसरातील संत आदिशक्ती मुक्ताई मंडळाच्या वतीने संत वासुदेव महाराज यांच्या स्मृतीत रिंग रोड परिसरात आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज गाथा सप्ताहास मंगळवारी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला.

 Tukaram Maharaj Gatha celebrated in the Koulkhed area | तुकाराम महाराज गाथा सप्ताहानिमीत्त कौलखेड परिसरात भव्य शोभायात्रा

तुकाराम महाराज गाथा सप्ताहानिमीत्त कौलखेड परिसरात भव्य शोभायात्रा

Next
ठळक मुद्दे रिंग रोड परिसरात आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज गाथा सप्ताहास मंगळवारी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. सुरुवातीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली, यामध्ये हजारो महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती.वाजतगाजत टाळमृदूंगाच्या गजरात ही शोभायात्रा कौलखेड मार्गे रिंग रोड परिसरातील कथा प्रांगणात येऊन या ठिकाणी या शोभायात्रेचे भक्तिभावात समापन करण्यात आले .


अकोला-वारकरी संप्रदायाची महती गत अठ्ठावीस वर्षांपासून सातत्याने समाजात प्रवाहित करणाºया कौलखेड परिसरातील संत आदिशक्ती मुक्ताई मंडळाच्या वतीने संत वासुदेव महाराज यांच्या स्मृतीत रिंग रोड परिसरात आयोजित श्रीसंत तुकाराम महाराज गाथा सप्ताहास मंगळवारी मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला. यावेळी सुरुवातीला भव्य शोभायात्रा काढण्यात आली, यामध्ये हजारो महिला पुरुष भाविकांची उपस्थिती होती.
पंढरपूर येथील हभप रामरावजी बजर यांच्या मार्गदशनात व पारायण व्यासपीठाच्या हभप सौ.शोभाताई पवार यांच्या उपस्थितीत ही भावकथा २७ फेबुवारीपर्यंत अनेक उपक्रमांच्या माध्यमातून प्रवचन समवेत चालणार आहे.य् ाात उभ्या राज्याला परिचित असणारे पंढरपूर येथील प्रख्यात प्रवचनकार हभप पुंडलिक महाराज जंगले हे नित्य सायंकाळी ६-३० ते रात्री ९ पर्यंत प्रवचन सादर करणार आहेत.
दरम्यान स्थानीय कौलखेड परिसरातील संत गजानन महाराज मंदिर प्रांगणातून श्रीसंत तुकाराम महाराज गाथाची भजनी दिंड्या व ढोलताश्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.वाजतगाजत टाळमृदूंगाच्या गजरात ही शोभायात्रा कौलखेड मार्गे रिंग रोड परिसरातील कथा प्रांगणात येऊन या ठिकाणी या शोभायात्रेचे भक्तिभावात समापन करण्यात आले .कथास्थळी हभप पुंडलिक महाराज जंगले यांच्या उपस्थितीत सेवाभावी नाना उजवणे, आशाताई गावंडे, संग्रामदादा गावंडे, स्वातीताई गावंडे, हभप मनोहर महाराज ,हभप रामराव महाराज,बजर, बाळाभाऊ गावंडे, पंकज गावंडे, हभप वासुदेवराव महल्ले यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात येऊन भक्तिभावात ग्रंथ पूजन व कलश पूजन करण्यात आले.या ज्ञानाच्या हरी उत्सवात महिला-पुरुष भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिशक्ती मुक्ताई मंडळाचे स्वागताध्यक्ष संग्रामदादा गावंडे,अध्यक्ष बाळाभाऊ गावंडे,हभप वासुदेवराव महल्ले,दि.बा. गावंडे, रामहरी टाले,डॉ.देविचंद काकड,सहदेवराव शिंदे, कार्याध्यक्ष युवराज गावंडे, जग्गनाथ वानखडे, साहेबराव वहिले,वासुदेवराव ढोरे, चिंतामण बजर,सुरेश धवस,भास्कर पटोकर,हभप मनोहरराव डुकरे,मनोहरराव करंजकर,रमेश काकड, ज्ञानबा खडसे,हरिभाऊ ताथुरकर,गजानन गावंडे, वामनराव अरबट, मोहन पाटील, नीलकंठ ढोरे, रामभाऊ काळे, सहदेव इंगळे, साखरे, नंदकिशोर मुळे,पंकज गावंडे, विशाल गावंडे,किशोर राजूरकर,पिंटू शिंदे, नरेंद्र मुळे , प्रवीण सावळे , शरद सरप यांनी केले आहे.

 

Web Title:  Tukaram Maharaj Gatha celebrated in the Koulkhed area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.