ठळक मुद्देबाभूळगाव जहागीर येथील घटनारस्त्याने जाणारा मजूर दबल्याने जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव जहा. (अकोला) : राख घेऊन जात असलेला ट्रक  उलटून त्याखाली रस्त्याने जाणारे मजूर दबल्याने एकजण  जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय  महामार्गावर बाभूळगाव जहागीरजवळ नवोदय विद्यालयासमोर  ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. सलमान खान  अय्युब खान (२६) असे मृतकाचे नाव आहे, तर शे. महेबुब  शे. कालू (४0), बब्बू खान (४५), शे. अकील शे. रउफ  (२९), शे. नफीस शे. खालीब, जयमाला सोनोने, बाबूराव  चव्हाण आदी   जखमी झाले आहेत. अपघातामुळे राष्ट्रीय  महामार्गावर तब्बल तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. 


बाभूळगाव येथील काही मजूर दुचाकीने मंगळवारी सकाळी ९  वाजता एमआयडीसमध्ये कामावर जात होते. दरम्यान,  बाभूळगाव जहा. येथे अमरावतीकडे राख घेऊन जात असलेल्या  ट्रक चालकाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न  केला. यामध्ये त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. त्याखाली  दुचाकीने जात असलेले मजूर दबल्या गेले. यामध्ये सलमान  याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर ज खमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव येथील ग्रामस् थांनी घटनास्थळावर धाव घेतली, तसेच दबलेल्या लोकांना  काढण्यासाठी प्रयत्न केले. दोन तास चाललेल्या बचाव कार्यानं तर राखेखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्यात पोलिसांना  यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश  कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर,  खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेळके, वाहतूक शाखेचे  ठाणेदार विलास पाटील, बोरगाव मंजूचे ठाणेदार काटकर  आदींनी घटनास्थळावर धाव घेतली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.