वृक्ष लागवड कार्यक्रम : अकोला जिल्ह्यात २० लाख खड्डे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 04:53 PM2018-06-18T16:53:32+5:302018-06-18T16:53:32+5:30

१८ जूनपर्यंत जिल्ह्यात २० लाख १५ हजार खड्डे तयार करण्यत आले असून, उर्वरित ८७ खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे.

Tree plantation program: Complete 20 lakh potholes in Akola district | वृक्ष लागवड कार्यक्रम : अकोला जिल्ह्यात २० लाख खड्डे पूर्ण 

वृक्ष लागवड कार्यक्रम : अकोला जिल्ह्यात २० लाख खड्डे पूर्ण 

Next
ठळक मुद्देवृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत २१ लाख २ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले त्यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे तयार करण्याचा ‘अल्टीमेटम ’ विभागीय आयुक्तांनी दिला होता. मात्र ‘अल्टीमेटम’ची मुदत उलटून गेली असली तरी ८७ खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे.

- संतोष येलकर

अकोला : वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत २१ लाख २ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे तयार करण्याचा ‘अल्टीमेटम ’ विभागीय आयुक्तांनी दिला होता; मात्र ‘अल्टीमेटम’ची मुदत उलटून गेली असली तरी, १८ जूनपर्यंत जिल्ह्यात २० लाख १५ हजार खड्डे तयार करण्यत आले असून, उर्वरित ८७ खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे.
हरित पर्यावरणासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यावर्षी १ ते ३१ जुलै या कालावधीत राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात लाख २१ लाख २ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट विविध यंत्रणांना देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३१ मे पर्यंत खड्डे तयार करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी गत महिन्यात दिले होते. पावसाळा सुरु झाला असून, १८ जूनपर्यंत जिल्ह्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यात संबंधित यंत्रणांमार्फत वृक्ष लागवडीसाठी २ लाख १५ हजार खड्डे तयार करण्यात आले. वृक्ष लागवड उद्दिष्टाच्या तुलनेत अद्याप ८७ हजार खड्डे तयार करण्याचे काम अद्याप बाकी आहे. पाऊस सुरु झाल्यास खड्डे तयार करण्याचे काम करणे शक्य होणार नाही, त्यानुषंगाने प्रलंबित असलेले खड्डे तयार करण्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले असे आहेत विभाग !
जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे विभागनिहाय उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यासाठी खड्डे तयार करण्याचे कामदेखिल संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक वनीकरण, ग्राम विकास विभाग, कृषी विभाग, नगरविकास विभाग, जलसंपदा विभागासह इतर विभागांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.

खड्डे तयार करण्याच्या कामावर दृष्टिक्षेप !
-एकूण करावयाचे खड्डे : २१ .०२ लाख
-तयार केलेले खड्डे : २०.१५ लाख
-बाकी असलेले खड्डे : ८८ हजार

 

Web Title: Tree plantation program: Complete 20 lakh potholes in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.