वाहने थांबविण्यासाठी वाहतूक व्यावसायीक, पदाधिकारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:17 PM2018-07-22T13:17:49+5:302018-07-22T13:21:01+5:30

अकोला: शुक्रवारपासून सुरू झालेले वाहतूकदारांचे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे शनिवारी अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले.

Transport association, vehicles, the businessman, on the road | वाहने थांबविण्यासाठी वाहतूक व्यावसायीक, पदाधिकारी रस्त्यावर

वाहने थांबविण्यासाठी वाहतूक व्यावसायीक, पदाधिकारी रस्त्यावर

googlenewsNext
ठळक मुद्दे देशभरातील वाहतूक व्यावसायिकांनी शुक्रवार, २० जुलैच्या सकाळी ६ वाजतापासून चक्का जाम सुरू केला आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यामुळे सर्व पदाधिकाºयांनी चौकाचौकात जाऊन वाहने अडविली. आंदोलनाचा परिणाम तीन दिवसानंतर सर्वसामान्य जनतेला जाणवणार असल्याचे बोलले जात आहे.


अकोला: शुक्रवारपासून सुरू झालेले वाहतूकदारांचे राष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलन शनिवारच्या दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. आंदोलनास मिळत असलेल्या संमिश्र प्रतिसादामुळे शनिवारी अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी वाहने थांबविण्यासाठी रस्त्यावर उतरले. अकोला-वाशिम बायपास मार्गावर उतरून या पदाधिकाºयांनी वाहन चालकांना चक्का जाम आंदोलनात सहभागी करून घेतले.
डीझल दरवाढ, टोल आकारणी आणि थर्ड पार्टी विम्यातील अपारदर्शकता, टीडीएस आकारणी आदी प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील वाहतूक व्यावसायिकांनी शुक्रवार, २० जुलैच्या सकाळी ६ वाजतापासून चक्का जाम सुरू केला आहे. पहिल्याच दिवशी अकोल्यातील विविध मार्गावर दोन हजार वाहने अडकून होती. आंदोलनाच्या दुसºया दिवशी अनेक मार्गावर वाहतूक सुरू असल्याची माहिती ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाºयांना मिळाली. त्यामुळे सर्व पदाधिकाºयांनी चौकाचौकात जाऊन वाहने अडविली. आंदोलनाचा परिणाम तीन दिवसानंतर सर्वसामान्य जनतेला जाणवणार असल्याचे बोलले जात आहे. वाहने थांबविण्यात अकोला ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मजहर अली, सचिव जावेद खान, बाबासेठ आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 

 

Web Title: Transport association, vehicles, the businessman, on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.