व्यापारी-अडत्यांनी पुकारला बेमुदत बंद; अकोला बाजार समितीमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:30 PM2018-09-02T12:30:55+5:302018-09-02T12:32:02+5:30

शासनाच्या भूमिकेविरुद्ध व्यापारी-अडतिया मंडळाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी बंद केली आहे.

  Trade-offs call ; Akola Market Committee closed | व्यापारी-अडत्यांनी पुकारला बेमुदत बंद; अकोला बाजार समितीमध्ये शुकशुकाट

व्यापारी-अडत्यांनी पुकारला बेमुदत बंद; अकोला बाजार समितीमध्ये शुकशुकाट

Next
ठळक मुद्देशनिवारी बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसून आला. बाजार समितीमधील १२५ अडत दुकाने बंद होती. व्यवहारही ठप्प झाले आहेत.

अकोला : शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केला, तर व्यापाºयास ५० हजार रुपये दंड व एक वर्ष कारावासाची शिक्षा होईल, असा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे व्यापारी-अडत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शासनाच्या भूमिकेविरुद्ध व्यापारी-अडतिया मंडळाने अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी बंद केली आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये शुकशुकाट दिसून आला. व्यवहारही ठप्प झाले आहेत.
केंद्र शासनाने शेतमालाचे हमीभाव जाहीर केले आहेत. या हमीभावानेच व्यापारी-अडत्यांनी शेतकºयांचा शेतमाल खरेदी केला पाहिजे. हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाºया व्यापाºयास आर्थिक दंड व कारावासाची शिक्षा करण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे; परंतु अद्याप शासनाने असा कोणताही निर्णय जाहीर केलेला नसतानाही राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी-अडत्यांनी शेतमालाची खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शनिवारी अकोला व्यापारी-अडतिया मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची खरेदी बंद केली. त्यामुळे बाजार समितीच्या आवारात शुकशुकाट होता. बाजार समितीमधील १२५ अडत दुकाने बंद होती. शासनाने भूमिका स्पष्ट करावी, तोपर्यंत बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी बंद राहील, अशी माहिती व्यापारी-अडतिया मंडळाचे अध्यक्ष रमेश मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.



शनिवारी बाजारात एका क्विंटलची आवक नाही
व्यापारी व अडत्यांनी शेतमाल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शनिवारी बाजार समितीमध्ये एकही क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली नाही आणि शेतकरीसुद्धा बाजार समितीकडे फिरकला नाही.

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास व्यापाऱ्याला ५0 हजार रुपये दंड व कारावास यासंदर्भात शासनाचा कोणताही अध्यादेश नाही.
- गोपाल मावळे, जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्था, अकोला.


हमीभावासंदर्भात शासनाचा १९६३ चा जुना निर्णय आहे. हमीभावाला आमचा विरोध नाही; परंतु ५0 हजार दंड आणि एक वर्षाच्या शिक्षेला आमचा विरोध आहे. यासंदर्भात राज्य शासन भूमिका स्पष्ट करीत नाही. तोपर्यंत बाजार समितीमधील व्यवहार बंद राहतील.
- रमेश मुंदडा, अध्यक्ष,
व्यापारी-अडतिया मंडळ.

आम्ही बाजार समिती बंद केली नाही. व्यापारी-अडत्यांनी शेतमालाची खरेदी बंद केली आहे. त्यांना शेतमालाची खरेदी सुरू ठेवण्याबाबत विनंती केली आहे. शासनाचा असा कोणताही निर्णय अद्याप झाल्याची माहिती नाही.
- शिरीष धोत्रे,
सभापती,
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती. />
हमीभावाने शासन आमची तूरच खरेदी करू शकले नाही. तीन महिन्यांपासून चुकारे दिले नाहीत. व्यापारी हमीभावाने शेतमाल खरेदी करू शकत नसतील, तर शासनाने दर क्विंटलमागे आम्हाला पैसे द्यावे, शासन-व्यापारी-अडत्यांच्या वादात शेतकºयांना वेठीस धरू नये.
- रवींद्र तिडके, शेतकरी, घुसर.

 

 

Web Title:   Trade-offs call ; Akola Market Committee closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.