अकोल्याचे तीन खेळाडू विदर्भ क्रिकेट संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 03:24 PM2019-01-20T15:24:23+5:302019-01-20T15:24:28+5:30

अकोला क्रिकेट क्लब अकोलाचे क्रिकेट खेळाडू अनुज लांडे, प्रबल चौखंडे व अभय सुतार या खेळाडंूची विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली.

Three players of Akola are in the Vidarbha Cricket Team | अकोल्याचे तीन खेळाडू विदर्भ क्रिकेट संघात

अकोल्याचे तीन खेळाडू विदर्भ क्रिकेट संघात

Next

अकोला: नागपूर येथे मध्य विभागांतर्गत २० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित १४ वर्षांखालील दोन दिवसीय राजसिंग डुंगरपूर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेकरिता अकोला क्रिकेट क्लब अकोलाचे क्रिकेट खेळाडू अनुज लांडे, प्रबल चौखंडे व अभय सुतार या खेळाडंूची विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली. तीनही खेळाडूंनी नागपूर येथे झालेल्या निवड चाचणी सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे त्यांची १४ वर्षांखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे. संघाचे नागपूर येथे सराव शिबिर सुरू आहे. विदर्भ संघाचा पहिला सामना २० व २१ जानेवारीला मध्य प्रदेश संघासोबत होईल, अशी माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक तथा अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.

Web Title: Three players of Akola are in the Vidarbha Cricket Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.