एसटी बसचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लक्झरीचालकास तीन महिन्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 09:46 PM2018-01-02T21:46:26+5:302018-01-02T21:46:56+5:30

​​​​​​​अकोला : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एसटी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण नेमाडे नामक आरोपीस बाळापूरचे प्रथम श्रेणी न्यायाधीश भूषण काळे यांनी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 

Three months' education for a luxury laborer who caused the death of ST bus operator | एसटी बसचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लक्झरीचालकास तीन महिन्याची शिक्षा

एसटी बसचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लक्झरीचालकास तीन महिन्याची शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देबाळापूर न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून एसटी चालकाच्या मृत्यूस  कारणीभूत ठरलेल्या श्रीकृष्ण नेमाडे नामक आरोपीस बाळापूरचे प्रथम श्रेणी न्यायाधीश  भूषण काळे यांनी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. 
अकोला ते शेगाव  बस क्रमांक एम. एच. ४0 - ८३३९  ही शेगावकडे जात असताना  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कान्हेरी फाटा येथे विरुद्ध दिशेने येणार्‍या लक्झरी  बस क्रमांक एम. एच.३१ सीक्यू  २0९९ने बसला धडक दिली होती.   यामध्ये एसटीच्या  समोरील भाग पूर्ण क्षतीग्रस्त झाला होता व २0 प्रवासी जखमी झाले होते. जखमीपैकी  एसटी वाहक एम. पी. मगर यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता.  बाळापूर पोलिसांनी लक्झरी चालक श्रीकृष्ण नेमाडे विरुद्ध भादंवी कलम २७९, ३३७ व  ३0४ अ  नुसार गुन्हा दाखल केला. तत्कालीन एपीआय चौधरी यांनी तपास पूर्ण करून  आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शीतल  शशिकांत राऊत यांनी ११ साक्षीदार तपासले. आरोपीने निष्काळजीपणे वाहन चालविले  ही बाब साक्षीदाराच्या बयाणात समोर आली. उभयतांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर  न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावत आरोपीस सर्वच गुन्ह्यात दोषी ठरवत  तीन महिन्यांचा कारावास ठोठावला. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत.  तसेच दोन हजार रुपये आरोपीस भरावा लागेल असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले  आहे.

Web Title: Three months' education for a luxury laborer who caused the death of ST bus operator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.