नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:11 AM2017-11-23T02:11:30+5:302017-11-23T02:12:47+5:30

अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 

There is no water for irrigation from nine projects! | नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

नऊ प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी नाही!

Next
ठळक मुद्देपातूर तालुका १४,१६४ हेक्टरमधील सकल कृषी उत्पन्नात घट

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला : अवर्षणप्रवणतेमुळे पातूर तालुक्यातील नऊ मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पात सिंचनासाठी पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १४,१६४ हेक्टरवरील २१ कोटी रुपयांचे २५000 टन कृषी उत्पन्न बुडणार आहे. खरिपानंतर रब्बी हंगामही शेतकर्‍यांचा कोरडा जाणार असल्याने शासनाने भरीव मदत देण्याची आस शेतकर्‍यांना लागली आहे. 
पातूर तालुक्यात एकूण पाटबंधारे विभागाचे नऊ मध्यम व लघू सिंचन प्रकल्प आहेत. रब्बीच्या हंगामासाठी सिंचन प्रकल्पमधून कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. मुख्य कालव्यातून पाटसर्‍याच्या माध्यमातून पोहोचणार्‍या पाण्यावर २४ हजारांहून अधिक शेतकरी गहू, हरभरा ही पिके रब्बीत दरवर्षी घेत असतात. यावर्षी मोर्णा प्रकल्प ७.४ दशलक्ष घनमीटर (१६.९८टक्के), निगुर्णा प्रकल्प १७.४६ द.ल.घ.मी. (६0.५१टक्के), सध्या पारस औष्णिक वीज प्रकल्प आणि शेगाव संस्थान एकूण १२.४८ द.ल.घ.मी. शासकीय आरक्षण, तुळजापूर 0.२९७ द.ल.घ.मी. (३४.१८टक्के), गावंडगाव 0.00 (0.00टक्के), सावरगाव 0.0५४ द.ल.घ.मी. (४.७९ टक्के), पातूर तलाव 0.६६५ द.ल.घ.मी. (३५.८८टक्के), विश्‍वमित्री प्रकल्प ३.२५ द.ल.घ.मी. (३२.५१टक्के), संग्राहक तलाव झरंडी 0.४१६ द.ल.घ.मी. (२३.१६टक्के) व हिवरा तलाव 0.२३८ द.ल.घ.मी. (१0.३८ टक्के) एवढीच पाण्याची पातळी आहे.
यावर्षी पातूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी खरिपातील अवर्षणप्रवणतेने हवालदिल झाल्यानंतर नव्या उमेदीने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीची संपूर्ण तयारी मोठय़ा जिकरीने पूर्ण केली होती. मात्र, सिंचनासाठी पाणी मिळणार नसल्याने मोठे संकट शेतकर्‍यांवर कोसळले आहे. 
पातूर तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक पावसाची हजेरी असते मात्र ह्यावर्षी ४00 मि. मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे खरिपाच्या हंगामातील उडीद, मूग, सोयाबीनचे पीक हातातून गेले. उत्पादन खर्चही निघाला नाह. मात्र, शासनाने कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत शेतकर्‍यांना अद्यापपयर्ंत केली नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पिके त्यातून मिळणार्‍या उत्पन्नातून खरिपातील अवर्षणप्रवणतेने झालेल्या नुकसानाची भरपाई भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाची केलेली संपूर्ण तयारी वाया गेली आहे. 

पातूर तालुक्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठा कमी आहे, सिंचनासाठी आवश्यक तेवढे पाणी कोणत्याही प्रकल्पात नाही 
- अत्तरकार, शाखा अभियंता, सिंचन विभाग पातूर
                             
पातूर तालुक्यातील लघू व मध्यम प्रकल्पावरील यावर्षीचा हंगाम रद्द करण्यात आला आहे. त्या संदर्भातील नियोजन सभा रद्द करण्यात आली आहे. 
- अनिल राठोड,  उप अभियंता सिंचन शाखा अकोला
 

Web Title: There is no water for irrigation from nine projects!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.