अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या

By atul.jaiswal | Published: February 17, 2018 06:49 PM2018-02-17T18:49:37+5:302018-02-17T18:52:48+5:30

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

 Ten thousand new power connections in a month in the Akola Zone | अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या

अकोला परिमंडळातील तिन जिल्ह्यांत एका महिन्यात दहा हजार नवीन वीज जोडण्या

Next
ठळक मुद्देकोला जिल्ह्यात २६४८ जोडण्या देण्यात आल्या असून, ५०७९ मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत.बुलढाणा मंडळामध्ये ७०७२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, ३१२१ मीटर बदलण्यात आले आहेत. वाशिम मंडळामध्ये २०११ नवीन वीज जोडण्या दिल्या तर एकूण २४२७ मीटर बदलले आहेत.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाअंतर्गत असलेल्या अकोला वाशिम व बुलढाणा मंडळामध्ये गतीने सेवा दिल्या जात असून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये १०,७२१ घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक या ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. सोबतच ग्राहकांना योग्य सेवा मिळावी म्हणून नादुरुस्त व बिघाड असलेले १०,६२७ वीज मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन वीज जोडणी वा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी मीटर उपलब्ध नसल्याच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महावितरणने केले आहे.
अकोला परिमंडळातील सर्वच कार्यालयामध्ये मुबलक प्रमाणात नवीन मीटर उपलब्ध असून त्यामुळे मीटर नसल्याची सबब सागून नवीन जोडणी करिता वा बदलाकरिता टाळाटाळ करीत असल्यास तसेच नादुरुस्त बिघाड असलेले मीटर बदलताना एजन्सीच्या कर्मचाºयांनी चुकीची माहिती, दिशाभूल वा पैशाची मागणी केल्यास थेट विभागीय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांनी केले आहे. परिमंडलात एका महिन्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या दहा हजारापेक्षा जास्त वीज जोडण्या दिल्या. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात २६४८ जोडण्या देण्यात आल्या असून, ५०७९ मीटर सुद्धा बदलण्यात आले आहेत. बुलढाणा मंडळामध्ये ७०७२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, ३१२१ मीटर बदलण्यात आले आहेत. तर वाशिम मंडळामध्ये २०११ नवीन वीज जोडण्या दिल्या तर एकूण २४२७ मीटर बदलले आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीच्या अर्जदारांना वीज जोडणी तत्परतेने देण्यात येत आहेत.


नवीन वीज जोडणी वा मीटर बदल करण्यासाठी नवीन मीटर उपलब्ध आहेत त्यामुळे कथित एजंटच्या भूलथापांना वा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता महावितरणच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.
- अरविंद भादिकर, मुख्य अभियंता, महावितरण,अकोला परिमंडळ.

Web Title:  Ten thousand new power connections in a month in the Akola Zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.