लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: न्यू तापडिया नगरातील एका मंदिराची आणि बिरला गेटजवळ असलेल्या जलाराम मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे उजेडात आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जलाराम मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. त्यानंतर याच मंदिरातील पूजेच्या ताटातील रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. या मंदिरातील चोरीसोबतच न्यू तापडिया नगरातील एका मंदिराची दानपेटी फोडण्यात आली असून, ५00 रुपये लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रविवारी पहाटे या चोरीच्या घटना उघड झाल्या.