टँकरचे पाणी ‘कुपन’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 02:10 AM2017-10-17T02:10:14+5:302017-10-17T02:11:15+5:30

जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांमध्ये टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात  गावागावांत होणारे वाद टाळण्यासाठी आणि प्रती मानसी समान  पाणी वितरणाकरिता ‘कुपन’वर पाणी वाटप करण्याची प्रायोगिक  उपाययोजना घुसर या गावात ग्रामपंचायतमार्फत रविवारपासून  सुरू करण्यात आली आहे.

Tanker water 'coupons'! | टँकरचे पाणी ‘कुपन’वर!

टँकरचे पाणी ‘कुपन’वर!

Next
ठळक मुद्देवाद टाळण्यासाठी समान पाणी वाटपाची उपाययोजना

संतोष येलकर । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील खारपाणपट्टय़ातल्या खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ४४ गावांमध्ये टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात  गावागावांत होणारे वाद टाळण्यासाठी आणि प्रती मानसी समान  पाणी वितरणाकरिता ‘कुपन’वर पाणी वाटप करण्याची प्रायोगिक  उपाययोजना घुसर या गावात ग्रामपंचायतमार्फत रविवारपासून  सुरू करण्यात आली आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू  असलेल्या इतरही गावात अशीच उपाययोजना राबविण्याचा प्रय त्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून खांबोरा प्रादेशिक पाणी  पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना आठ दिवसांआड पाणी पुरवठा  करण्यात येत होता; परंतु उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने  योजनेंतर्गत गावांचा पाणी पुरवठा गत ७ ऑगस्टपासून बंद  करण्यात आला. त्यामुळे  खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनें तर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू  करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला.  त्यानुसार १0 सप्टेंबरपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात  आला आहे. ६१ पैकी ४४ गावांमध्ये सध्या २५ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरद्वारे पाणी वाटपात कमी-जास्त  पाणी मिळण्यावरून वाद होऊ नये आणि  प्रती मानसी १00  लीटरप्रमाणे प्रती कुटुंबाला किमान ६00 लीटर पाणी मिळावे,  यासाठी अकोला तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त घुसर येथे ‘कु पन’वर टँकरचे पाणी वाटपाचा उपक्रम ग्रामपंचायतमार्फत सुरू  करण्यात आला आहे. वाद टाळण्यासाठी आणि समान पाणी  वाटपासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेला असाच  उपक्रम टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार्‍या इतरही गावात  राबविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

नियमित पाणी पुरवठा करण्याचे निर्देश!
टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे सुरू असलेल्या पाणी पुरवठा  कामाचा आढावा सोमवारी अकोला तहसील कार्यालयात घेण्या त आला. दिवाळीच्या दिवसात टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या  पाण्यासाठी ग्रामस्थांची अडचण होऊ नये, यासाठी नियमित  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देश अकोल्याचे प्रभारी उ पविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी या बैठकीत दिले.  नियमित पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित  ग्रामसेवकांची राहणार आहे.या बैठकीला तहसीलदार राजेश्‍वर  हांडे, गटविकास अधिकारी डॉ.दिलीप पाटील उपस्थित होते.

‘कुपन’वर असे होते पाणी वाटप!
टँकरद्वारे पाणी वाटपासाठी अकोला तालुक्यातील घुसर येथे  ग्रामपंचायतमार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला कुपन देण्यात  आले. टँकरद्वारे पाणी वाटपात प्रती मानसी १00 लीटरप्रमाणे प्र त्येक कुटुंबाला ६00 लीटरपर्यंत पाणी वाटप करण्यात येते. पाणी  वितरित केलेल्या तारखेलाच  संबंधित कुटुंबातील सदस्याची  ‘कुपन’वर स्वाक्षरी घेतली जाते.

६१ पैकी ४४ गावांनाच मिळाले टँकरचे पाणी!
खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६१ गावांना टँकरद्वारे  पाणी पुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे;  मात्र आतापर्यंत ६१ पैकी ४४ गावांनाच २५ टँकरद्वारे पाणी  पुरवठा सुरू करण्यात आला असून, उर्वरित गावांना अद्यापही  टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही.

टँकरद्वारे पाणी वितरणात कमी-जास्त पाणी वितरणावरून होणारे  वाद टाळण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार सर्वांना पाणी  मिळावे, यासाठी घुसर या गावात प्रायोगित तत्त्वावर ‘कुपन’वर  पाणी वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशीच उ पाययोजना तालुक्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेल्या  इतरही गावात करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.

Web Title: Tanker water 'coupons'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी