तूर, हरभरा अनुदानासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:54 PM2018-06-25T13:54:29+5:302018-06-25T13:57:49+5:30

अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान येणार आहे

subsidy for farmer whose tuar yet to procure by nafed | तूर, हरभरा अनुदानासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा!

तूर, हरभरा अनुदानासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा!

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात तूर व हरभरा खरेदी संथ गतीने करण्यात आली असून, खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करण्यात आली. राज्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या १२ लाख २० हजार ६८४ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी बाकी आहे. खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला.

- संतोष येलकर
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान येणार आहे. दोन हेक्टर मर्यादेत अनुदान देण्यात येणार असून, शेतकºयांना अनुदान देण्यासाठी हेक्टरी १० क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीत खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी गोदामात जागा उपलब्ध नसल्याने, राज्यात तूर व हरभरा खरेदी संथ गतीने करण्यात आली असून, खरेदी प्रक्रिया वारंवार बंद करण्यात आली. त्यामुळे पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना तूर व हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षा करावी लागली. राज्यात गत १५ मेपासून तूर खरेदी आणि १३ जूनपासून हरभरा खरेदी नाफेडमार्फत बंद करण्यात आली. खरेदी बंद करण्यात आल्यानंतर राज्यात आॅनलाइन नोंदणी केलेल्या १२ लाख २० हजार ६८४ शेतकºयांची तूर व हरभरा खरेदी बाकी आहे. त्यानुषंगाने नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला. या निर्णयानुसार नोंदणी केलेल्या मात्र खरेदी बाकी असलेल्या शेतकºयांना अनुदान वाटप करण्यासाठी १० क्विंटल हेक्टरी मर्यादा निश्चित करण्यात आली असून, दोन हेक्टर मर्यादेत अनुदान वाटप करण्याचा निर्णय १९ जून रोजी शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार नोंदणी केलेल्या; परंतु खरेदी बाकी असलेल्या तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी १० क्विंटल मर्यादेत प्रतिक्विंटल एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान मिळणार आहे.

राज्यात तूर-हरभरा खरेदी बाकी असलेले असे आहेत शेतकरी!
-तूर खरेदी बाकी असलेले शेतकरी : ९२२०७६
-हरभरा खरेदी बाकी असलेले शेतकरी : २९८६०८
......................................................................
एकूण :                 १२२०६८४

अनुदानासाठी ‘ते’ शेतकरी ठरणार अपात्र!
आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकºयांना तूर ‘एसएमएस’ पाठविला; मात्र ठोस कारण नसताना संबंधित शेतकºयांनी खरेदी केंद्रांवर तूर आणली नाही, अशा शेतकºयांना तूर अनुदानासाठी अपात्र ठरविण्याचे निर्देशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत.

 

Web Title: subsidy for farmer whose tuar yet to procure by nafed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.