नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 02:20 PM2018-03-21T14:20:40+5:302018-03-21T14:20:40+5:30

अकोला: विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह एनएसयूआयने जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे केली आहे.

Students from nursing college will be deprived from the annual examination! | नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित!

नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी राहणार वार्षिक परीक्षेपासून वंचित!

Next
ठळक मुद्देकान्हेरी येथील पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी २0१७ व १८ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेतला.सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कॉलेजचे प्रशासन कोणतेही कारण न सांगता, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगत आहे. नर्सिंग कॉलेजच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

अकोला: खडकीजवळील पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये २0१७ व १८ सत्रासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करून तासिकांना हजेरी लावली. विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा जून महिन्यात होणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह एनएसयूआयने जिल्हाधिकारी व आरोग्य विभागाकडे केली आहे.
कान्हेरी येथील पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी २0१७ व १८ या शैक्षणिक सत्रासाठी प्रवेश घेतला. वर्षभर तासिकांना हजेरी लावून अभ्यास केला. परीक्षेचे अर्ज आणि शुल्क भरले. कॉलेजनेसुद्धा विद्यार्थ्यांकडून शुल्क स्वीकारले. जून महिन्यात विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे; परंतु कॉलेज प्रशासन काही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास नकार देत असल्याने, विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही कॉलेजचे प्रशासन कोणतेही कारण न सांगता, तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही, असे सांगत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना जाब विचारल्यावर, प्राचार्य उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. नवीन शासन निर्णय आला आहे. परीक्षा शुल्काची अडचण निर्माण झाली. तसेच प्रवेश अर्ज उशिरा पोहोचले, अशी कारणे प्राचार्य सांगत आहेत आणि परीक्षेला बसण्यास विद्यार्थ्यांना नकार देत आहेत. नर्सिंग कॉलेजच्या आडमुठ्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी, तक्रारीची गंभीर दखल घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तक्रार देणाºया शिष्टमंडळात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, नर्सिंगचे विद्यार्थी अभिजित टेकाडे, आकाश वानखडे, अनुरूप उगले, अर्जुन वºहाडे, अश्विनी गवई, भारती गीते, कल्याणी वाघमारे, मनीषा अघडते, मोहन नेमाडे, निकिता जावरे, पायल शिरसाट, प्रतीक मुरकुटे, प्रतीक कापनकर, प्रतीक्षा चव्हाण, रोहन माकोडे, रोशन कोगदे, ऋषिकेश शेगोकार, साक्षी भांबुरकर, साक्षी बागडे, शंतनु बोरकर, श्वेता मनवर, शिवाली बाठे, श्रद्धा वाघमारे, प्रतीक्षा साबळे, चैतन्य इंगळे, दौलत गावंडे, खुश्नुमा खान, हर्षदा जाधव, विनय जामोदे, विशाखा वासनिक, कृतिका गव्हाळे आदींचा समावेश आहे.



डीएमईआरतर्फे १५ नोव्हेंबरला विद्यार्थ्यांचे नर्सिंगला प्रवेश घेतले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येते, तसेच विद्यापीठाने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तास पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे परीक्षा अर्ज नाकारल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी आमचा विद्यापीठासोबत पत्रव्यवहार सुरू आहे; परंतु एका विद्यार्थी संघटनेचा नेता विद्यार्थ्यांना हाताशी धरून खंडणी मागण्यासाठी ही उठाठेव करीत आहेत. त्याची तक्रार करणार आहे.
- अ‍ॅड. वैशाली वालचाळे, सचिव, पांडुरंग पाटील नर्सिंग कॉलेज

 

Web Title: Students from nursing college will be deprived from the annual examination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.