तूर-हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याच्या गोदामांचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 04:20 PM2018-03-31T16:20:09+5:302018-03-31T16:20:09+5:30

अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे.

For the storage of tur and gram now the discovery of the rental warehouse! | तूर-हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याच्या गोदामांचा शोध!

तूर-हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याच्या गोदामांचा शोध!

googlenewsNext
ठळक मुद्दे५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर आणि ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे.गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये अद्याप पडून आहे.जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात तूर व हरभरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही.

- संतोष येलकर
अकोला : ‘नाफेड’मार्फत गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पडून आहे. त्यातच यावर्षी खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठवणुकीची भर पडली आहे. त्यामुळे गोदामांमध्ये जागा नसल्याने तूर व हरभरा साठवणुकीसाठी आता भाड्याने खासगी गोदाम घेण्यासाठी राज्य वखार महामंडळाकडून गोदामांचा शोध घेतला जात आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर आणि ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हरभरा खरेदी करण्यात येत आहे. खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा जिल्ह्यातील राज्य वखार महामंडळाच्या गोदामांत साठविण्यात येत आहे; परंतु गतवर्षी खरेदी करण्यात आलेली एक लाख क्विंटल तूर वखार महामंडळाच्या जिल्ह्यातील १३ गोदामांमध्ये अद्याप पडून आहे. त्यातच यावर्षी नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेली तूर व हरभरा साठविण्यात येत असल्याने, जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात तूर व हरभरा साठविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी करण्यात येत असलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी आता भाडेतत्त्वावर गोदाम घेण्याची तयारी वखार महामंडळामार्फत सुरू करण्यात आली असून, भाड्याने गोदाम कोठे मिळणार, याबाबतचा शोध घेण्यात येत आहे.



खरेदी केंद्र बंद पडण्याच्या मार्गावर; शेतकरी पेचात!
नाफेडमार्फत तूर व हरभरा खरेदीत साठवणुकीसाठी जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये जागा नसल्याने, जिल्ह्यातील केंद्रांवर तूर-हरभरा खरेदी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे तूर-हरभरा साठवणुकीचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार आणि खरेदी सुरळीत केव्हा होणार, असा पेच जिल्ह्यातील तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.


सात केंद्रांवर अशी करण्यात आली तूर-हरभरा खरेदी!
नाफेडमार्फत खरेदीत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात येत आहे. त्यामध्ये २८ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही केंद्रांवर ७७ हजार क्विंटल तूर आणि २ हजार ५०० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे.

‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदीत खरेदी करण्यात आलेली तूर व हरभरा साठविण्यासाठी जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे तूर-हरभरा साठवणुकीसाठी खासगी गोदाम भाड्याने घेण्याची कार्यवाही वखार महामंडळामार्फत सुरू करण्यात आली आहे.
-राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

Web Title: For the storage of tur and gram now the discovery of the rental warehouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.