राज्य स्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:57 AM2017-11-22T01:57:59+5:302017-11-22T01:59:40+5:30

अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली.

State level school boxing tournament concludes | राज्य स्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप 

राज्य स्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेचा समारोप 

Next
ठळक मुद्देनाशिक व मुंबई विभागाने मारली बाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धा-२0१७ मधील मुलींच्या गटातील लढती मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाल्या. अंतिम फेरीमध्ये नाशिक व मुंबईच्या बॉक्सरांनीदेखील आपल्या ठोशांचा जोर दाखवित बाजी मारली.
१९ वर्षाआतील मुलींच्या  गटात  शारदा पाटील (नाशिक), पूजा पुंड (नाशिक),  श्‍वेता भोसले (मुंबई), अंजली गुप्ता (मुंबई) अश्‍विनी कांबळे (औरंगाबाद), यशo्री (कोल्हापूर) ऋतुजा चव्हाण (औरंगाबाद) यांनी विजेतेपद पटाकाविले.
१७ वर्षाआतील गटात विविध वजनगटामध्ये शुभांगी भोये (नाशिक), प्रज्ञा शिंदे (नाशिक),  आस्था चौधरी (मुंबई),  आयना खान (औरंगाबाद) लक्ष्मी सूर्यवंशी (नागपूर), दीक्षा गवई (अमरावती), पल्लवी येल्ले (लातूर), ऋतुजा  देशमुख (लातूर)  यांनी विजय मिळविला 
राज्यस्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण ९ विभाग अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक व क्रीडापीठातून २३७ मुली खेळाडू सहभागी झाल्या असून, संघ व्यवस्थापक १८ तसेच राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झालेले होते. राज्यस्तर बॉक्सिंग (मुली) स्पर्धेचे उद्घाटन २१ नोव्हेंबर  रोजी सायंकाळी झाले. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, गिरीश गोखले, संग्राम गावंडे, डॉ. क्रिष्णकुमार शर्मा, अँड. विजय शर्मा, शरद अग्रवाल, अतुल कोंडुलीकर, अतुल ठाकरे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त केल्याबाबत विधी रावल, पूनम कैथवास, साक्षी गायधने, दिया बचे, गौरी जयसिंगपुरे या महिला बॉक्सरांचा सत्कार करण्यात आला.
 स्पर्धेला पंच म्हणून विजय गोटे, मुलजी कोली, दिनेश छाबने, ऋषिकेश वायकल, ऋषिकेश टाकलकर,  अजित ओसवाल, सुधीर ओवल, अबमल सैय्यद, सुनील तराडे, महेश मिलेकर, संपत सांलुखे, प्रशांत प्रजापती, तीर्थनाथ गाधवे, अक्षय टेंबुर्णीकर, विशाल सुनारीवाल, बे. अंजार, सतीश प्रधान, वंदना पिंपळखेरे, शिल्पा गायधनी, प्रगती करवाडे, सपना विरघट, रवींद्र माली, मिलिंद पवार, शंकर सिंग, प्रमोद सुरवाडे, अजय जयस्वाल, विक्रमसिंग चंदेल यांनी कामगिरी बजावली. 

Web Title: State level school boxing tournament concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.