सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:51 PM2019-01-30T15:51:26+5:302019-01-30T15:51:58+5:30

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे.

soya bean; Chances of rising prices | सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

सोयाबीनची आवक वाढली; भाव वधारण्याची शक्यता

Next

अकोला: सोयाबीनला विदेशातून वाढलेली मागणी आणि सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याची वेळ एकत्र आल्याने सोयाबीनचे भाव वधारले आहे. सध्या सोयाबीनला ३,८५० प्रतिक्विंटलचे भाव असले तरी ४ हजारांच्या पलीकडे भाव जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.
अकोला कृ षी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, चार दिवसांत हजारो क्विंटल माल जमा झाला आहे. महाराष्ट्रात हा साठा अडीच लाख क्विंटलच्या घरात जमा झाल्याचे जाणकारांचे मत आहे. सोयाबीनचे बाजारभाव पडण्याआधी तो विक्री करण्याकडे शेतकºयांचा कल आहे. दरम्यान, अनेक शेतकरी ४ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळण्याची अपेक्षा लावून आहे. सोयाबीनला गेल्या काही दिवसांपासून इराणहून मोठी मागणी सुरू झाली आहे. केंद्राने स्वाक्षरी करून निर्यात सुरू केली असून, देशभरातील सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे. राज्याच्या शासकीय यंत्रणेसोबतच एनसीडीईएक्सकडील सोयाबीनचा साठाही वाढला आहे. एनसीडीईक्सजवळ २८ जानेवारीपर्यंत १,३९,४८१ क्विंटल सोयाबीनचा साठा आहे. त्यातही अकोला जिल्हा अव्वल असून ३८,२२८ क्विंटल साठा गोडावूनमध्ये आहे. अकोला पाठोपाठ इंदोर- २७,१४१ क्विंटल, कोटा -२५,०९८ क्विंटल, विशादा-१७,३४० क्विंटल, मंदसूर-१३,९१५ क्विंटल, शूजालपूर- १५,१८१ क्विंटल, सागर- १,८२४ क्विंटल, नागपूर- ५०१ क्विंटल, लातूर -२५३ क्विंटल साठा गोळा झाल्याच्या नोंदी आहे.

 

Web Title: soya bean; Chances of rising prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.