अकोला रेल्वे स्टेशनच्या टीएनसी कार्यालयात शॉर्ट सर्किट

By लोकमत न्यूज नेटवर्क on Thu, January 04, 2018 1:33am

अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील टीएनसी कार्यालयात बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटची घटना घडली. मात्र, येथील महिला कर्मचारीच्या समयसूचकतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली.

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : स्थानिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवरील टीएनसी कार्यालयात बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटची घटना घडली. मात्र, येथील महिला कर्मचारीच्या समयसूचकतेमुळे होणारी मोठी दुर्घटना टळली. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजता टीएनसी कार्यालयात अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आग पाहताच, येथे उपस्थित असलेल्या एस.एस. ऑफीसची महिला कर्मचारी यासमीन नाज हिने तातडीने धाव घेत, स्टेशन अधीक्षक कार्यालयातील अग्नी विरोधक उपकरण काढून आग विझविली.  त्यामुळे होणारी दुर्घटना टळली. यामध्ये एल.आय. गावंडे यांनीदेखील सहकार्य केले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित करण्यात आला होता. त्यामुळे स्थानकावरील उद्घोषणाप्रणाली देखील काही वेळासाठी बंद झाली होती.

संबंधित

नशीब ! जाग आली आणि जीव वाचला 
बॅलार्ड पियर येथे इमारतीतील दुकानाला आग 
दादरमध्ये इमारतीला आग 
हेमलता चित्रपटगृहास आग
कदमवाकवस्ती येथे दुभाजकाला धडकून टँकरने घेतला पेट

अकोला कडून आणखी

२८ एकरांवरील खोदतळ्यांमध्ये पाणी साठा!
बोंडअळीचे ‘पतंग’ पुन्हा धडकले
अकोला जिल्हा परिषद अध्यक्षाच्या लाचखोर पीएविरुद्ध गुन्हा दाखल
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा! - महावितरणचे आवाहन
‘जीएमसी’मधील कंत्राटी वार्ड बॉय, सफाई कामगारांचे वेतन रखडले

आणखी वाचा