नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उरळ शेतकरी पुत्रांचे मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 05:46 PM2018-08-20T17:46:36+5:302018-08-20T17:48:44+5:30

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले.

'Sholay Style' movement on the mobile tower of Url Farmers' sons | नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उरळ शेतकरी पुत्रांचे मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उरळ शेतकरी पुत्रांचे मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Next
ठळक मुद्देउरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.

उरळ (अकोला) : बोंडअळीने झालेल्या नुकसानीची मदत तसेच कर्जमाफीचा लाभ देण्याच्या मागणीसाठी उरळ येथील दोन शेतकरी पुत्र २१ आॅगस्ट रोजी सकाळी गावातील मोबाइल टॉवरवर चढले. जोपर्यंत उरळ गावातील शेतकºयांना मदत दिली जात नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा इशारा या युवकांनी दिला आहे. गोपाल अंबादास पोहरे आणि गणेश वामन पोहरे अशी या युवकांची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिल्याने दोन्ही युवक सायंकाळी ५ वाजता टॉवरवरून खाली उतरले.
गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना शासनाने मदतीची घोषणा केली होती. अनेक गावांना मदतीचे वितरण झाले; मात्र उरळ गावातील एकाही शेतकºयाला मदत मिळाली नाही, तसेच कर्जमाफीचाही लाभ शेतकºयांना मिळाला नाही, त्यामुळे गावातील गोपाल पोहरे आणि गणेश पोहरे यांनी आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळे वेगळे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही शेतकरी पुत्र सकाळी ११ वाजता गावातील मोबाइल टॉवरवर चढले, तसेच आपल्या मागण्यांविषयी पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी जोपर्यंत आश्वासन देणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा दिला. घटनेची माहिती मिळताच उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी आपल्या सहकाºयांसह घटनास्थळ गाठले, तसेच उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, बाळापूरचे तहसीलदार दीपक पुंडे यांनी उरळ येथे भेट देऊन शेतकºयांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिले; मात्र जोपर्यंत पालकमंत्री अथवा जिल्हाधिकारी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत टॉवरच्या खाली उतरणार नसल्याचा इशारा युवकांनी दिला होता. मात्र, एसडीओ खडसे यांनी बोंडअळीची मदत येत्या १५ दिवसात शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे तसेच कर्जमाफीसाठी जिल्हाधिकाºयांची शेतकºयांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे सायंकाळी दोन्ही युवक टॉवरच्या खाली उतरले. (वार्ताहर)
 

 

Web Title: 'Sholay Style' movement on the mobile tower of Url Farmers' sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.