ठळक मुद्देदोन दिवसांत कामाला सुरुवात!‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना दुचाकीवरून घडवले रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित  असणार्‍या शहरातील प्रमुख रस्त्यांची दैनावस्था झाली असून,  खड्डय़ांमुळे अकोलेकर कमालीचे वैतागले आहेत. संबंधित  विभागाचा ढिम्मपणा लक्षात घेता मंगळवारी शिवसेनेचे शहर  प्रमुख राजेश मिश्रा यांनी ‘पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मि थीलेश चव्हाण यांना दुचाकीवरून रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन  घडवले. रस्ता दुरुस्तीला तातडीने सुरुवात न केल्यास  आंदोलनाचा इशारा सेनेच्यावतीने देण्यात आला. 
शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मंगळवारी ‘ पीडब्ल्यूडी’चे कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण यांना रस् त्यांवरील खड्डय़ांचे छायाचित्र भेटस्वरूपात देण्यात आले.  अधिकार्‍यांना खड्डय़ांची नेमकी स्थिती जाणून घेता यावी, यासाठी  राजेश मिश्रा यांनी कार्यकारी अभियंत्यांना स्वत:च्या दुचाकीवरून  शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डय़ांचे दर्शन घडवले. रस्त्यांची  तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन  छेडण्याचा इशारा बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात  आला. याप्रसंगी शहर संघटक संतोष अनासने, तरुण बगेरे, उ पशहर प्रमुख मुन्ना मिश्रा, अभिषेक खरसाडे, मनोज बाविस्कर,  नगरसेवक गजानन चव्हाण, शशी चोपडे, योगेश गीते, माजी  नगरसेवक शरद तुरकर, नितीन मिश्रा, विभाग प्रमुख रूपेश ढोरे,  प्रकाश वानखडे, संतोष रणपिसे, दीपक पांडे, संजय अग्रवाल,  सागर पाटील, सुनील दुर्गिया, अजय मनवानी, लक्ष्मण पंजाबी,  निखिल ठाकू र, विशाल लढ्ढा, नितीन ढोले, रामा गायकवाड,  शुभम इंगळे, देवानंद गावंडे, आशु तिवारी, मयूर राठी आदींसह  शिवसैनिक उपस्थित होते. 

दोन दिवसांत कामाला सुरुवात!
शहरात ‘पीडब्ल्यूडी’च्या अखत्यारित असणार्‍या प्रमुख रस् त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम येत्या दोन दिवसांत सुरु करणार  असल्याचे आश्‍वासन कार्यकारी अभियंता मिथीलेश चव्हाण  यांनी शिवसेनेला दिले.