The selection of the under-13 cricketers will be held today in Akola | आज अकोल्यात होणार १३ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी 
आज अकोल्यात होणार १३ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी 

ठळक मुद्दे‘व्हीसीए’ची निवड चाचणीअकोला विभागीय क्रिकेट संघासाठी होणार निवडअकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील क्रिकेटपटू होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भ क्रिकेट संघटने अंतर्गत व्हीसीएच्या निवड चाचणी सामन्याकरिता अकोला विभागीय क्रिकेट संघाची निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणी ही १३ वर्षाखालील खेळाडूंकरिता राहील. निवड चाचणी शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे सकाळी ९ वाजता सुरू  होईल. अकोला विभागामध्ये अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ाचा समावेश आहे.
ज्या खेळाडूंची जन्मतारीख १ सप्टेंबर २00४ च्या नंतर असेल, असे खेळाडू १३ वर्षाखालील निवड चाचणी करिता पात्र ठरतील. निवड चाचणीकरिता कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आक ारण्यात येणार नाही. निवड चाचणी ही अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील खेळाडूंकरिता आहे.
विदर्भातून उच्च दर्जाचे क्रिकेटपटू निर्माण व्हावे, याकरिता १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. निवड चाचणीमधून अकोला विभागीय संघ निवडल्या जाणार आहे, अशी माहिती विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे जिल्हा समितीचे चेअरमन आल्हाद गोखले व व्हीसीए जिल्हा समिती सदस्य तथा अकोला जिल्हा संयोजक भरत डिक्कर, बुलडाणा जिल्हा संयोजक किशोर वाकोडे, वाशिम जिल्हा संयोजक संजय गायकवाड यांनी दिली.


Web Title: The selection of the under-13 cricketers will be held today in Akola
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.