जागा २४८२,  विद्यार्थ्यांची नोंदणी ४ हजार ३८0;  कोणाला लागणार २५ टक्के प्रवेशाची लॉटरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:30 PM2018-03-03T14:30:17+5:302018-03-03T14:30:17+5:30

२0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Seats 2482, enrollment of students 4 thousand 380 | जागा २४८२,  विद्यार्थ्यांची नोंदणी ४ हजार ३८0;  कोणाला लागणार २५ टक्के प्रवेशाची लॉटरी?

जागा २४८२,  विद्यार्थ्यांची नोंदणी ४ हजार ३८0;  कोणाला लागणार २५ टक्के प्रवेशाची लॉटरी?

Next
ठळक मुद्दे२८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

- नितीन गव्हाळे

 अकोला : आरटीईनुसार इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी सुरू आहे. पालकांच्या सोयीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने नोंदणीची मुदत ७ मार्च केली असल्याने, आता विद्यार्थ्यांची आणखी नोंदणी वाढणार आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३८0 विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली आहे. २0८ शाळांमध्ये २४८२ जागांवर २५ टक्केप्रमाणे प्रवेश दिले जाणार आहेत. जागा कमी आणि विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त. यामुळे कोणा-कोणाला २५ टक्के प्रवेशाची लॉटरी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वास्तविकता, २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही वंचित घटकांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्व जाती, धर्मातील दिव्यांग मुले, तसेच दुर्बल घटकांतर्गत कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणारे, खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु, प्रक्रियेमध्ये एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले, पती-पत्नी दोघेही शासकीय नोकरीत असूनही ते सुद्धा २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यासाठी बोगस उत्पन्नाचे प्रमाणपत्रही हे लोक जोडतात. त्यामुळे एक लाखापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात अनेक पालकांनी पुराव्यांसह शिक्षणाधिकाºयांकडे तक्रारी केल्या. परंतु, या तक्रारींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आरटीईच्या २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाने यावर तोडगा काढण्याची मागणी पालकांनी केली आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थीही लाभ घेत असल्याने, यंदा २४८२ जागांसाठी चार हजारांच्यावर आॅनलाइन नोंदणी झाली आहे. ७ मार्चपर्यंत ही नोंदणी आठ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशाची लॉटरी कोणा-कोणाला लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.




रहिवासी दाखलाही मिळवितात बोगस
पालकांना पाल्याच्या निवासस्थानापासून एक किमी, तीन किमी किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावरील शाळेचा समावेश आॅनलाइन अर्जात करावा लागतो. शाळेपासून एक किमी अंतराच्या परिसरात राहणाºया पालकाला प्रवेशासाठी प्राधान्य मिळत असल्याने, अनेक पालक एक किमी, तीन किमी शाळेच्या परिसरात राहत असल्याचे बोगस रहिवासी प्रमाणपत्र, पुरावा जोडत असल्याचे प्रकार घडत आहेत.

खात्रीशीर प्रवेश मिळेलच असे नाही?
शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत/लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जाणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच, याची शाश्वती नाही.

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही विशेष तपासणी करू. परंतु, आर्थिकदृष्ट्या पालक सक्षम आहेत, शासकीय नोकरीत आहेत, असे शाळांना आढळून आल्यास, त्यांचे प्रवेश नाकारणाºयाचे अधिकार मुख्याध्यापक, संस्थेला आहेत. सुखसंपन्न विद्यार्थ्यांमुळे गरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना २५ टक्के प्रवेशापासून वंचित राहावे लागते, हे खरे आहे. यासंदर्भात वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी

 

Web Title: Seats 2482, enrollment of students 4 thousand 380

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.