शिक्षकांची भरणार समितीपुढे शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 02:27 PM2019-05-26T14:27:30+5:302019-05-26T14:27:36+5:30

अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची प्रथमच समितीपुढे पाठ सादर करण्यासाठीची शाळा भरणार आहे.

Schools teachers will appear before committee | शिक्षकांची भरणार समितीपुढे शाळा!

शिक्षकांची भरणार समितीपुढे शाळा!

Next

अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांची प्रथमच समितीपुढे पाठ सादर करण्यासाठीची शाळा भरणार आहे. त्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ४ व ७ जून रोजी शिक्षकांना बोलाविण्यात आले आहे. हा प्रकार प्रथमच होत असल्याने शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यशाळा आयोजित करून त्या ठिकाणी समितीसमोर शिक्षकांना पाठाचे सादरीकरण करावे लागणार आहे. सोबतच शाळेची संपूर्ण रेकॉर्डची माहिती घेऊन येण्याचेही बजावण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील २० शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले आहे. पाच सदस्यीय समितीसमोर शिक्षकांना पाठाचे धडे द्यावे लागणार आहेत. ती समितीही गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये संस्थेचे प्राचार्य, संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता विस्तार अधिकारी परोपटे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांचा समावेश आहे.
४ जून रोजी सकाळी १०.३० वाजता बोलावलेल्या मुख्याध्यापकांना रेकॉर्डसह उपस्थित राहावे लागणार आहे. त्यामध्ये पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांचा समावेश आहे. त्यांच्या रेकॉर्डची तपासणी पाच अधिकाऱ्यांची समिती करणार आहे, तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
- या शिक्षकांना शिकवावा लागणार पाठ!
७ जून रोजी मोºहळ येथील नलिनी तायडे, मोझरी येथील साहेबराव लोणाग्रे, पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड-गोपाल लोखंडे, प्रवीण कºहाळे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, कोठारी- अनिल चºहाटे, साईनगर- मोरताळे, देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे, कळंबेश्वर- जी. पी. कोल्हे, पातूरचे गटसमन्वयक के.डी. चव्हाण यांना समितीसमोर पाठाचे सादरीकरण करावे लागणार आहे. प्रत्येकाला त्यासाठी २० मिनिटे देण्यात आली आहेत. या प्रकाराने शिक्षक पुरते धास्तावले आहेत.
- पहिलीच घटना
शिक्षक यांना समितीसमोर पाठाचे सादरीकरण करण्यास लावण्याची ही पहिली घटना आहे. शिक्षकांना अशाप्रकारे पाठ घेण्यास सांगण्याऐवजी जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास संस्थेमध्ये कार्यरत विविध विषयांच्या विषय शिक्षकांनी नियमित नमुना आदर्श पाठ घेणे आवश्यक आहे, तसेच अप्रगत विद्यार्थी विषयनिहाय प्रगत करण्यासाठी गुणवत्ता विकास संस्थेने प्रत्यक्ष शाळांवर जाऊन अध्यापन करण्याचा सविस्तर कार्यक्रम आखण्याची गरज आहे.

 

Web Title: Schools teachers will appear before committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.