सात-बारा बंद; मिळकत पत्रिकेचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:48 PM2019-06-18T16:48:38+5:302019-06-18T16:48:46+5:30

अकोला: गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सात-बारा देणे महसूल विभागाने बंद केले आहे.

Saat-bara extract closed; The confusion of income trail | सात-बारा बंद; मिळकत पत्रिकेचा गोंधळ

सात-बारा बंद; मिळकत पत्रिकेचा गोंधळ

googlenewsNext

- सदानंद सिरसाट
अकोला: गावठाण, शहरी भागातील नगर भूमापन योजना लागू असलेल्या क्षेत्रातील जमिनीचा सात-बारा देणे महसूल विभागाने बंद केले आहे. रद्द केलेल्या सात-बारामधील भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत करण्याऐवजी भूखंडधारकांना भूमी अभिलेख विभागात कमालीचा त्रास देण्याचे प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, काही दलालांमार्फत ही कामे विनासायास होत आहे. अकोला शहरातील १२८० सात-बारा बंद झाल्याने त्यातील ६६९ एकरात पडलेल्या भूखंडधारकांना भूमी अभिलेख विभागात चकरा माराव्या लागत आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार शेत जमिनीसाठी सात-बारा, तर नगर भूमापन किंवा गावठाण क्षेत्रासाठी मिळकत पत्रिका हा अधिकार अभिलेख आहे. तरीही नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील जमीन मालकांची नावे मिळकत पत्रिका व सात-बारा घेण्याची प्रथा सुरूच आहे. त्यामुळे जमिनीच्या हक्कामध्ये गुंतागुंत होऊन फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले. विशेष म्हणजे, हे प्रकार एकच भूखंड किंवा जमिनीची दुहेरी नोंद होत असल्याने घडल्याचे निदर्शनास आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी गावठाण, नगर भूमापन कोणत्याही भूखंड, जमिनीची एकच नोंद पद्धत ठेवण्याचा आदेश जमाबंदी आयुक्तांना द्यावा लागला. यापूर्वीही ही दुहेरी नोंद पद्धत बंद करण्यासाठी डिसेंबर १९९० पासून जुलै २०११ पर्यंत सातत्याने आदेश देण्यात आले. तरीही राज्यातील नगर भूमापन असणाऱ्या क्षेत्रातील सात-बारा अद्यापही बंद झालेला नाही, हा प्रकार तातडीने बंद करून मिळकत पत्रिका नोंदीची प्रक्रिया सुरू करा, असा आदेश राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी ३० आॅगस्ट २०१८ रोजी दिला.
- सात-बारा बंद करण्याच्या प्रक्रियेला फाटा
- नागरी, गावठाण क्षेत्रासाठी नगर भूमापन योजना लागू झाली व मिळकत पत्रिका तयार झाली, त्या ठिकाणी बिनशेती झालेली सर्व सात-बारा बंद करणे.
- नगर रचना योजना लागू असल्यास त्या क्षेत्रातील सात-बारा व जुन्या मिळकत पत्रिका बंद करून नगर रचना योजनेत तयार झालेले बी फॉर्मनुसार अंतिम भूखंड क्रमांकानुसार मिळकत पत्रिकेवरील नोंदी कायम करणे अथवा नवीन मिळकत पत्रिका उघडणे. तहसीलदार प्रत्येक गावासाठी आदेश काढून ई-फेरफार आज्ञावलीतून
फेरफार घेऊन सात-बारा बंद करण्याचे निर्देश देतील. मिळकत पत्रिका व सात-बारावरील क्षेत्राच्या नोंदीमध्ये तफावत असल्यास प्रत्यक्ष मोजणी करून भूखंडनिहाय मिळकत पत्रिका अद्ययावत करण्याची प्रक्रिया ठरवून देण्यात आली; मात्र त्या प्रक्रियेला महसूल, भूमी अभिलेख विभागात फाटा दिला जात आहे.
- शहरातील बंद झालेले सात-बारा
गाव               सात-बारा संख्या                 क्षेत्र (हे.आर)
अकोली बु.             ३                                      २
तपलाबाद               ४                                 १०.६७
अक्कलकोट         १७                                  २८.९५
सुकापूर               ३३८                                  १५.२
अकोला               २२२                                 ६०.३२
शहानवाजपूर      १३                                    २४.०१
नायगाव             ५९                                     १६.७४
उमरी प्रगणे        २२३                                     ४९.७३
उमरखेड            ८५                                          ३२.६६
मलकापूर          ३१६                                         ३०.६९

 

Web Title: Saat-bara extract closed; The confusion of income trail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.