रासप राज्यात विधानसभेच्या १२ जागा लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:30 PM2019-06-05T13:30:59+5:302019-06-05T13:31:08+5:30

अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत बक्षीस म्हणून घवघवीत जागा मिळणार असल्याचे संकेत असून, राष्ट्रीय   समाज पक्षाला राज्यात १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे.

 RSP will contest 12 assembly seats in the state! | रासप राज्यात विधानसभेच्या १२ जागा लढणार !

रासप राज्यात विधानसभेच्या १२ जागा लढणार !

Next

- राजरत्न सिरसाट

अकोला : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या घटक पक्षांना विधानसभा निवडणुकीत बक्षीस म्हणून घवघवीत जागा मिळणार असल्याचे संकेत असून, राष्ट्रीय   समाज पक्षाला राज्यात १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. यात रासपतर्फे अकोला जिल्ह्यातील एका मतदारसंघात निवडणूक लढण्यात येणार आहे. तशा सूचना पक्षश्रेष्ठींकडून रासपच्या जिल्हा कार्यकारिणीला प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात असल्याचेही जिल्हा रासपच्यावतीने सांगण्यात येत आहे.
महादेवराव जाणकर प्रणित राष्ट्रीय   समाज पक्ष राज्यात भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीसोबत आहे. सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात जाणकर दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष म्हणून रासपला एकही जागा मिळाली नाही, त्यामुळे राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तथापि, जाणकर यांच्या खातर कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचाच धर्म पाळत घटक पक्षांना विधानसभेच्या समाधानकारक जागा सोडल्या जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय   समाज पक्षाला १२ जागा दिल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यात एक जागा सोडली जाणार असल्याने जिल्हा रासप एका विधानसभा मतदार संघाची चाचपणी करीत आहे. अकोट व बाळापूर हे दोन विधानसभा मतदार संघ रासपला निवडणूक लढविण्यासाठी सोयीचे वाटत असल्याने या दोन मतदार संघांपैकी एक मतदार संघ निवडला जाणार असल्याचे वृत्त आहे. यासाठी रासप जिल्हाध्यक्षाचे नावही चर्चेत असून, कार्यकर्तेही अनुकूल आहेत. दरम्यान, जिल्ह्यात एक जागा लढण्यात येणार असल्याने यासाठी एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती जिल्हा रासपकडून प्राप्त झाली. यामध्ये काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश आहे.

 विधानसभेच्या १२ जागा रासपला सोडण्यात येणार आहेत. यामध्ये अकोला जिल्ह्यातही एक जागा मिळणार असल्याचे संकेत पक्षाचे राष्ट्रीय  अध्यक्ष महादेवराव जाणकर यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने मतदार संघाची चाचपणी सुरू केली असून, बाळापूर व अकोट मतदार संघाची माहिती गोळा केली जात आहे. यासाठी एक माजी आमदार व तीन जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या संपर्कात आहेत. यात काँग्रेसचा समावेश आहे.
- सतीश हांडे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय   समाज पक्ष, अकोला.
 

 

Web Title:  RSP will contest 12 assembly seats in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.